कोविड सेंटरमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना विमा कवच, नियमित वेतन व पुरेशी संरक्षक साधने द्या - समरजितसिंह घाटगे यांची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

15 October 2020

कोविड सेंटरमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना विमा कवच, नियमित वेतन व पुरेशी संरक्षक साधने द्या - समरजितसिंह घाटगे यांची मागणी

संवादवेळी महिला कर्मचाऱ्यांच्या भावनांचा फुटला बांध 

चंदगड येथे कोविड काळजी सेंटर'मध्ये वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधताना शाहू साखर कारखान्याचे चेअरमन समरजितसिंह घाटगे, शिवाजीराव पाटील, भरमूआण्णा पाटील, गोपाळराव पाटील, रविंद्र बांदिवडेकर, दिपक पाटील व इतर.

चंदगड/ प्रतिनिधी

          कोविड  सेंटरमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना विमा कवच, नियमित वेतन व सर्वच कोरोना योद्ध्यांना पुरेशी संरक्षक साधने द्या. अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष व शाहू साखर कारखान्याचे चेअरमन समरजितसिंह घाटगे यांनी केले. आज चंदगड येथील कोविड काळजी केंद्राच्या भेटीवेळी ते बोलत होते.

          यावेळी त्यांनी केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. त्यांच्यासमोर कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. या कंत्राटी कर्मचाऱ्यांसह सर्वच कोरोना योद्ध्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याची ग्वाही सुद्धा त्यांनी यावेळी दिली.

           यावेळी भरमूआण्णा पाटील, गोपाळराव पाटील, शिवाजीराव पाटील, दिपक पाटील, शांताराम पाटील, समृद्धी काणेकर, रवींद्र बांदिवडेकर, प्रताप सूर्यवंशी, बबन देसाई, उदयकुमार देशपांडे, राम पाटील, आर. जी. पाटील, मल्लिकार्जुन मुगेरी यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 

               आणी त्यांच्या भावनांचा बांध फुटला...

               या संवादावेळी श्री. घाटगे यांनी गेल्या चार महिन्याच्या कोरोना काळामध्ये महिला कर्मचाऱ्यांनी बजावलेले कर्तव्य विशेष कौतुकास्पद आहे. कोरोना सेंटरमध्ये कर्तव्य बजावून घरी गेल्यानंतर त्यांना मुलांना भेटता येत नव्हते. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत आरोग्य सेवा बजावताना त्यांनी केलेली कसरत अभिनंदनीय आहे, असे गौरवोदगार काढले. या संवाद वेळी मनीषा तांबाळकर या आरोग्य परिचारीकेला अश्रू अनावर झाले. आणि त्यांच्या भावनांचा बांध फुटला. श्री. घाटगे यांनी आपल्या भावना समजून घेतल्याबद्दल त्यांनी त्यांचे विशेष आभार मानले. यावेळी सर्वांनाच गहिवरुन आले.

No comments:

Post a Comment