चंदगड एसटी आगारातून मूंबई बस सेवा सूरू - चंदगड लाईव्ह न्युज

03 October 2020

चंदगड एसटी आगारातून मूंबई बस सेवा सूरू

चंदगड / प्रतिनिधी

      चंदगड आगारातून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली मूबंई (परेल) बस सेवा आज रविवार  दि. ४ऑक्टोबर पासून सूरू होत असल्याची माहिती आगारप्रमुख गौतम गाडवे यानी दिली. 

    कोरोनाच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल पासून चंदगड आगारातून बस सेवा बंद होती, पण शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत चंदगड आगारातून चंदगड-मूंबई (परेल) हि बस सेवा आज रविवार दि.४ऑक्टोबर पासून सूरू करण्यात आली आहे. चंदगड आगारातून चंदगड-मुंबई(परेल) ही  बस चंदगडहुन सकाळी 7.45 वाजता सुटेल, व मुंबईहुन(परेल)  सकाळी 06.00 वाजता चंदगड कडे सूटेल.या बस फेरीला तिकिट दर पूर्वीचेच ठेवण्यात आले आहेत.त्यामुळे प्रवाशी वर्गाने या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन चंदगड आगारामार्फत करण्यात आले आहे. No comments:

Post a Comment