हथरस मधील पिडीत मुलीला न्याय मिळावा, माणगाव येथे कॅँडल मार्च - चंदगड लाईव्ह न्युज

03 October 2020

हथरस मधील पिडीत मुलीला न्याय मिळावा, माणगाव येथे कॅँडल मार्च

माणगाव (ता. चंदगड) येथे पिडीत मुलीला न्याय मिळावा यासाठी कँडल मार्च काढण्यात आला. 

चंदगड / प्रतिनिधी

हाथरसमध्ये निष्पाप दलित मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी व पीडितेला न्याय मिळावा यासाठी आज सायंकाळी माणगांव ता.चंदगड येथे  कँडल मार्च काढण्यात आला. या कँडल मार्चची सुरुवात राजे उमाजी नाईक स्मारकापासून करण्यात आली. कँडल मार्च गावातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापर्यंत काढून पुन्हा राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकापर्यंत काढण्यात आला. त्यानंतर दोन मिनिटे मौन पाळून पीडितेला श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी अरुण चिंचणगी आणि सागर पिटूक यांनी या अमानुष घटनेच्या निषेधार्थ मनोगत व्यक्त केले. रमेश नाईक, आप्पाजी ससेमारी, लक्ष्मण व्हन्याळकर, प्रकाश नाईक, अशोक चिंचणगी, विनायक पिटुक, प्रशांत नाईक, युवराज वाघमोडे यांच्यासह गावातील तरुण वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता. अगदी शांततेनत काढलेल्या या कँडल मार्चची सांगताही शांततेत झाली.No comments:

Post a Comment