कोवाड महाविद्यालयात बॅकलॉग परीक्षा सुरक्षितपणे चालू - चंदगड लाईव्ह न्युज

02 October 2020

कोवाड महाविद्यालयात बॅकलॉग परीक्षा सुरक्षितपणे चालू

कोवाड (ता. चंदगड) येथील महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारात असा फलक लावून नियमांचे पालन केले जात आहे.

कोवाड / सी. एल. वृत्तसेवा

       कोवाड (ता. चंदगड) येथील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात बीए, बीकॉम, बीएस्सी आणि बी सी ए च्या सत्र 3,4,5 च्या अंतिम वर्षातील रिपीटर विद्यार्थ्यांच्या परीक्षा  महाविद्यालयात सुरू झालेल्या आहेत. कोरोना काळात खबरदारीचे उपाय म्हणून  शासनाने निर्गमित केलेल्या सर्व सूचनांचे पालन काटेकोरपणे केले जात आहे. महाविद्यालय परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आलेला आहे. तसेच सोशल डिस्टंसिंग पाळून महाविद्यालयांमध्ये परीक्षा सुरू आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांची शारीरिक तपासणी करून महाविद्यालयात प्रवेश दिला जात आहे त्यासाठी स्क्रीनिग मशीन, ऑक्सीमीटर आणि टेंपरेचर मशीन चा वापर केला जात आहे.  प्रत्येक विद्यार्थ्याला मास्क शिवाय परिसरामध्ये प्रवेश दिला जात नाही. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावरच ''नो मास्क नो एन्ट्री '' असा फलक लावण्यात आलेला आहे .खबरदारीचे सर्व  उपाययोजना प्रशासकीय यंत्रणेमार्फत राबवल्या जात आहे. परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ व्ही आर पाटील परीक्षा विभाग प्रमुख प्राध्यापक आर टी पाटील डॉ. एस एन. कांबळे आणि प्रशासकीय सेवक कर्मचारी आणि प्राध्यापक वृंद परीक्षा सुरळीतपणे सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

No comments:

Post a Comment