कोवाड महाविद्यालयात गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंती संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

02 October 2020

कोवाड महाविद्यालयात गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंती संपन्न

कोवाड महाविद्यालयात गांधी जयंती आणि लालबहादूर लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त पूजन करताना मान्यवर. 

कोवाड / सी. एल. वृत्तसेवा

      कोवाड (ता. चंदगड) येथील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि  लालबहादूर शास्त्री यांची जयंती साध्या पद्धतीने संपन्न करण्यात आली. महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य प्रा डॉ व्ही. आर पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन पूजन झाले. राष्ट्रपुरुष यांच्या चरित्राचा कार्याचा आढावा डॉ. पाटील यांनी घेतला.
        प्रास्ताविक डॉ. व्ही. के. दळवी  यांनी केले यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक प्रशासकीय सेवक कर्मचारी वृंद उपस्थित होता आभर प्रा. आर टी पाटील यांनी मानले सूत्रसंचालन परशाराम पाटील यांनी केले सदर कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी प्रा. व्ही के दळवी दळवी, प्रा. एन पी महागावकर, दीपक पाटील, परशराम पाटील आधी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment