चंदगड, आजरा, गडहिग्लज तालूक्याच्या भाग मिळून बनलेल्या गडहिंग्लज उप विभागाच्या प्रांताधिकारी म्हणून दोन वर्षांपूर्वी रुजू झालेल्या विजया पांगारकर यांची ऐन कोरोनाच्या काळात बदली झाली. महापूर, अतिवृष्टी, हेरे सरजांम, मराठा जातीचे दाखले यासह कोरोनाच्या संकटात उत्कृष्ट कार्य केलेल्या पांगारकर यांची बदली नेमकी कशासाठी, नियमानुसार त्यांची बदली होण्यास अजून वर्षभराचा अवधी होता. कोरोनाच्या काळात प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी केलेले कार्य खरोखर कौतुकास्पद आहे. कोरोना काळात नागरिकांची भेट घेत त्या स्वत: कोरोना पाॅझीटीव्ह झाल्या. ही बातमी आई वडिलांना कळू न देता स्वत: कोरोनाटाईन होत मोबाईलवरून काम सूरूच ठेवले. इतकं कर्तव्यदक्षपणे कार्य करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली अचानकपणें केल्याने उलटसुलट चर्चांना जिल्ह्यात उत आला आहे. त्यामुळे पांगारकर यांची बदलीच करायची असेल त्याचा कार्यकाल पूर्णं झाल्यावर तरी किंवा कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतरच ती का केली नाही? हा चर्चेचा विषय आहे. त्यामुळे त्यांच्या बदली मागे नेमकं कोणतं कारण आहे हे मात्र स्पष्ट झालेले नाही.
कोरोना काळात कर्यात भागात तेऊरवाडी येथे वास्तव्यास असणाऱ्या मध्यप्रदेश येथील आदिवासींची व्यथा चंदगड तालुका पत्रकार संघामार्फत चालविणाऱ्या जाणाऱ्या `चंदगड लाईव्ह न्युजने` मांडली. या वृत्ताची तात्काळ दखल घेवून आदिवासींना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी तत्परतेने उपाययोजना करुन या आदिवासींना अखेर त्यांच्या गावी बसने सुखरुप पाठवले. अशा उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व संवेदनशील असलेल्या प्रांताधिकारी यांच्या बदलीमुळे जनमाणसात चर्चा आहे.
अधिकारी म्हणून उत्कृष्ट कार्य केले होते. प्रांत कार्यालयात त्या असताना सामान्य माणसाला आधार वाटत होता. मात्र अचानक बदली झाल्याने पुन्हा नागरीकांना कामासाठी फेऱ्या माराव्या लागणार आहेत. दोन वर्षात प्रांत कार्यालयातील कामाची निर्गत झाली होती. कामात एकसुत्रीपणा आला होता. हेरे सरंजाम, अतिवृष्टी, महापूर, आदिवासींना त्यांच्या मुळ गावी पोहोचविणे आदी कामात उत्कृष्ट कार्य केलेल्या प्रांताधिकाऱ्यांची अचानक बदली झाल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने त्याची बदली रद्द करुन गडहिंग्लज येथेच त्याचा कार्यकाळ पुर्ण करण्यासाठी ठेवावे अशी मागणी सरपंच संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ पारसे यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment