भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी रत्नप्रभा देसाई यांची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

04 October 2020

भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी रत्नप्रभा देसाई यांची निवड

भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी रत्नप्रभा देसाई यांना निवडीचे पत्र देताना. 

चंदगड / प्रतिनिधी 

     भारतीय जनता पक्षाच्या युवमोर्चा कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष पदी अडकुर (ता. चंदगड) येथील सौ. रत्नप्रभा जयंत देसाई यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र युवमोर्चा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज यादव यांच्या सहीने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्याहस्ते त्यांना प्रदान करण्यात आले.

   तालुक्यातील अधिकाधिक युवक-युवतींना भारतीय जनता पक्षाशी जोडण्यात त्यांच्या कौशल्याचा वापर व्हावा तसेच युवमोर्चाची ताकद व संघटन तालुक्यात वाढवावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातल्या कार्याची दखल घेत त्यांना ही जबाबदारी देण्यात आली. याबद्दल त्यांच सर्व स्तरावर कौतुक होत आहे. यावेळी जयंत देसाई, अशोक जाधव, जगन्नाथ इंगवले, नीलम कोदाळकर, नामदेव आपटेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


 

No comments:

Post a Comment