चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहाद्दुर शास्त्री जयंती साजरी झाली. |
चंदगड / प्रतिनिधी
र. भा. माडखोलकर महाविद्यालय, चंदगडमथ्ये राष्ट्रीय सेवा योजना व हिंदी विभागाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी प्रा संजय पाटील यांनी केले. साधी राहणी व उच्च विचार तसेच शांति व अहिंसेचा मार्ग जगालाा दाखवणारे महात्मा गांधी व मूर्ती लहान पण कीर्ती महान असे देशाचे दूसरे पंतप्रधान थोर व्यक्तीमत्व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या आचारांची व विचारांची आज देशाला नितांत गरज आहे. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ पी आर पाटील यांनी अध्यक्षस्थानावरून केले. ते पुढे असे म्हणाले की सारे जग आज कोरोनासारख्या महामारीला सामोरे जात आहे, मानव निर्मित वा नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी प्रत्येकाने संयमाने व धैर्यानं या परिस्थितीला प्रतिकार करावयास शिकले पाहिजे. कोरोना योद्धे म्हणून स्वयंसेवक उत्तम भूमिका निभावत आहात, त्याबद्दल आपले कौतूक व अभिनंदन. आजच्या युवकांना जयंतीच्या निमित्ताने अशा थोर महात्म्यांचे स्मरण व्हावे हाच या कार्यक्रमाचा हेतू आहे. स्वयंसेवकांना कर्मनिष्ठ बना असा संदेश ही त्यानी दिला. सोशल डिस्टन्स ठेवून, मास्कचा वापर करून सर्वांनी 'माझे कुटुंब माझीच जबाबदारी' हा संदेश घरोघरी पोहोचविण्याची शपथ घेतली. यावेळी सर्व स्टाफ व स्वयंसेवक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा ए. डी. कांबळे यांनी केले व आभार डाॅ. एन. के. पाटील यांनी मानले.
1 comment:
Thanks for quick response.
Very nice News cover.
Post a Comment