चंदगड आगाराने चंदगड-कुदनुर, कालकुंद्री-बेळगाव बस सेवा सुरू करावी, प्रवासी वर्गातून मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

04 October 2020

चंदगड आगाराने चंदगड-कुदनुर, कालकुंद्री-बेळगाव बस सेवा सुरू करावी, प्रवासी वर्गातून मागणी

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

    गेल्या सहा-सात महिन्यापासून कोरोनामुळे बंद असलेली एसटी महामंडळ बस सेवा हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. प्रवासी वर्गातून याचे स्वागत होत आहे.

    चंदगड आगारानेही गेल्या काही दिवसात चंदगड- बेळगाव, चंदगड- कोवाड, चंदगड-मुंबई आदी बसफेऱ्या सुरु केल्या आहेत. तथापि चंदगड तालुक्याच्या पूर्व भागातील कालकुंद्री, कुदनूर, राजगोळी, कामेवाडी परिसराला गेल्या सात महिन्यात एसटीचे दर्शन झालेले नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे स्वतःचे वाहन नाही अशा प्रवाशांची मोठी कुचंबणा सुरू आहे. प्रवाशांच्या मागणीचा विचार करून चंदगड आगार व्यवस्थापकांनी चंदगड - कुदनूर तसेच कालकुंद्री- बेळगाव सेवा सुरू करावी अशी मागणी प्रवाशी वर्गातून वाढत आहे. सध्या आजरा आगाराच्या आजरा- बेळगाव बस फेऱ्या नियमित सुरू झाल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

      गेल्या सात महिन्यात बससेवा पूर्ण ठप्प झाल्यामुळे याचा मोठा फटका महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला बसला असून त्याचा परिणाम चालक, वाहक, तंत्रज्ञ आदी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर झाल्यामुळे त्यांचीही आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. सध्या कोरोनाचा प्रकोप थांबलेला नसला तरी त्या वरील लस येईपर्यंत कोरोना सोबतच जगण्याची मानसिक तयारी सर्व नागरिकांनी केली आहे. त्यामुळे चंदगड आगाराने आपल्या सर्वच मार्गावरील बसेस पूर्ण क्षमतेने नसल्यातरी हळूहळू सुरुवात कराव्यात अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.No comments:

Post a Comment