केंद्र सरकारने संमत केलेल्या शेतकरी कामगार कायद्याविरोधात गडहिंग्लज तालुका काँग्रेसचे भव्य धरणे व रस्ता रोको आंदोलन - चंदगड लाईव्ह न्युज

02 October 2020

केंद्र सरकारने संमत केलेल्या शेतकरी कामगार कायद्याविरोधात गडहिंग्लज तालुका काँग्रेसचे भव्य धरणे व रस्ता रोको आंदोलन

गडहिंग्लज येथे भाजप सरकार विरोधी धरणे व रास्ता रोको आंदोलन करताना विद्याधर गुरबे, दिग्वीजय कुराडे, सोमगोंडा आरबोळे

तेऊरवाडी - सी. एल. वृत्तसेवा

              काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या संकल्पनेतून व काँग्रेस नेते आदरणीय राहूलजी गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान आदरणीय लाल बहादूर शास्त्रीजी  यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सुचनेनुसार कोल्हापूर जिल्हाचे पालकमंत्री मा.ना.सतेज (बंटी)पाटील साहेब यांच्या नेतृत्वात आज संपूर्ण कोल्हापूर जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात केंद्रीय भाजपा सरकारने विरोधी पक्षाची मतं जाणून न घेता असंसदीय पद्धतीने आवाजी मतदानाने शेतकरी-कामगार वर्गाला भांडवलदारांच्या दावणीला बांधणारे अन्यायकारक काळे कायदे समंत करून घेतल्याच्या विरोधात तसेच हाथरस येथील पिडितेच्या कुटुंबियांची विचारपूस व त्यांचे सांत्वन करण्यास जात असलेले काँग्रेस नेते राहूलजी गांधी व प्रियंका गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीचा निषेध करण्यासाठी गडहिंग्लज येथे राजश्री शाहू महाराज कृषि उत्पन्न बाजार समिती समोर भव्य धरणे आंदोलन करण्यात आले.

         यावेळी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यांचे समन्वयक विद्याधर गुरबे यांच्या प्रमुख उपस्थितीत धरणे आंदोलनाला सुरवात झाली. सुरवातीलाच धरणे आंदोलनात केंद्रीय भाजपा सरकारने संमत केलेल्या शेतकरी-कामगार कायद्या विरोधात घोषणा बाजीने राजश्री शाहू महाराज कृषि उत्पन्न बाजार समितीचा परीसर दणाणून गेला होता. या वेळी अॅड. दिग्विजय कुराडे यांना स्वागतपर मनोगत व्यक्त करतेवेळी या धरणे आंदोलना पाठीमागचा उद्देश स्पष्ट केला. काँग्रेस कार्यकर्ता अमर गोडसे यांनी हुकूशाही प्रवृत्तीचे हे भाजपा सरकार शेतकरी-कामगार विरोधात कायदे समंत करून कशा पद्धतीने हा देश व या देशाची अर्थ व्यवस्था भांडवलदारांच्या घशात घालण्याचा घाट घालत आहे हे त्यांच्या भाषणात नमूद केले. गडहिंग्लज शहर काँग्रेसचे अध्यक्ष  बसवराज आजरी म्हणाले,  शेतकरी-कामगार वर्गाला देशोधडीला लावणाऱ्या , कायद्यांचा जोरदार  दडपशाही करणाऱ्या भाजप सरकारचा निषेध असो .

           काँग्रेसचे जेष्ठ नेते किसनराव कुराडे यांनी केंद्र सरकारच्या भोंगळ कारभारावर आसूड ओढत भाजपा सरकारच्या कार्यकाळात लोकशाही मुल्य पायदळी तुडवली जात असून हा देश हुकूशाहीच्या दिशेने अगदी वेगाने वाटचाल करीत असलयाचं मत व्यक्त केले.धरणे आंदोलनात अचानकपणे अगदी स्वयंप्रेरणेने पक्षीय मतभेद बाजूला ठेऊन माजी आमदार व जनता दलाचे जेष्ठ विचारवंत नेते श्रीपतरावजी शिंदे यांनी देखिल सहभागी होत या धरणे आंदोलनाला पाठींबा देत येणाऱ्या काळात सर्वच पक्षांनी राजकीय मतभेद बाजूला सारून ह्या भांडवलदार धार्जिण हुकूशाही प्रवृत्तीच्या भाजपा सरकार विरोधात एकसंघपणे लढा उभारण्याची नितांत गरज असल्याचे मत नोंदवले. सोमगोंडा आरबोळे यांनी ह्या देशाच्या उभारणी मध्ये व शेतकरी-कामगार वर्गाचे हात बळकट करण्यामध्ये काँग्रेसच्या योगदानाचा आढावा घेतला.

            धरणे आंदोलनाच्या शेवटी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस विद्याधर गुरबे यांनी केंद्र सरकारच्या दमणनितींचा जोरदार निषेध करत शेतकरी-कामगार वर्गाच्या हिताचे सरंक्षण करण्यास  काँग्रेस नेते व जिल्हयाचे पालकमंत्री आदरणीय सतेज ( बंटी ) पाटील यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व काँग्रेसी शेतकरी-कामगार वर्गाच्या सदैव पाठीशी असल्याचे सांगत या आंदोलनाची पुढील दिशा ठरवत येणाऱ्या काळात गडहिंग्लज,आजरा,चंदगड तालुक्यात भव्य आशी शेतकरी सह्यांची मोहीम राबवणार असल्याचे सांगत या तिन्हीं तालुक्यातील तमाम काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या सह्यांच्या मोहिमेत सक्रीय सहभाग घेत तालुक्यातील प्रत्येक शेतकरयाच्या बांधावर जात केंद्र सरकारच्या शेतकरी-कामगार कायद्यांचा नेमका काय धोका आहे हे समजावून सांगत जास्तीत जास्त शेतकरी बांधवांच्या सह्या घेण्याचे अवाहन केले.

               धरणे आंदोलनाच्या शेवटी शेतकरी-कामगार विरोधी कायद्यांचा व काँग्रेस नेते राहूलजी गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या धक्का बुक्कीचा निषेध नोंदविण्यासाठी गडहिंग्लज-संकेश्र्वर रस्ता रोको आंदोलन देखिल करण्यात आले. या वेळी चंदगड विधानसभा मतदार संघाचे माजी सरचिटणीस अजिंक्य चव्हाण, प्रदीप पाटील, अजित बंदी, राम परीट, दयानंद पट्टणकुडी, तम्मना पाटील, राजशेखर येरटे यांच्यासह गडहिंग्लज तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment