अथर्व-दौलत सहा लाख टन उस गाळप करणार - खोराटे, अथर्व - दौलतच्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नि प्रदिपन संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

02 October 2020

अथर्व-दौलत सहा लाख टन उस गाळप करणार - खोराटे, अथर्व - दौलतच्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नि प्रदिपन संपन्न

दौलत-अथर्व च्या बाॅयलरमध्थे आहुत टाकून हंगामाचा शुभारंभ करताना अध्यक्ष मानसिंग खोराटे, आबासो  देसाई, सौ. सुजाता देसाई, मनिषा खोरोटे, पृथ्वीराज खोराटे, संचालक राजू देसाई आदी.
चंदगड / प्रतिनिधी 

          हलकर्णी (ता. चंदगड) येथील - अथर्व - दौलतच्या सन २०२०-२१ गळीत हंगामासाठी बॉयलर अग्नि - प्रदिपन कारखान्याचे बॉयलर विभागातील कर्मचारी आबासो शामराव देसाई व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ सुजाता आबासो देसाई यांचे हस्ते संपन्न झाला. 

     प्रारंभी उपस्थितांचे स्वागत संचालक पृथ्वीराज खोराटे यानी केले. यावेळी २०२०-२१ गळीत हंगामात ६ लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तसेच तोडणी वाहतुक यंत्रणेची बीले वेळेत देणार आहोत त्यामध्ये खंड पडू देणार नाही . असे अथर्व - दौलतचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी व्यक्त केले आहे. कारखान्यातील मशिनरी दुरुस्तीची कामे पुर्ण होऊन सर्व मशिनरीची ट्रायल चालु आहेत. १५ ऑक्टोबर पासून कारखाना ऊस गाळप करायला सज्ज होणार आहे . तोडणी वाहतुक यंत्रणासुध्दा सक्षम केली असून, ऊस नोंदीनुसार ऊसाची तोडणी केली जाईल असेही श्री. खोराटे यांनी सांगीतले. यावेळी सौ. मनिषा खोरोटे, पृथ्वीराज खोराटे, संचालक राजू देसाई, सेक्रेटरी व्यंकटेश ज्योती, जनरल मॅनेजर (टेक्नीकल) एम. भंडारे, चिफ केमिस्ट अजित सांळुखे, मुख्य शेती अधिकारी, डे. जनरल मॅनेजर (पॉवर), एच आर मॅनेजर, अकौंट फायनान्स मॅनेजर, सर्व खातेप्रमुख व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

No comments:

Post a Comment