शिक्षकाविरोधात चंदगड पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल - चंदगड लाईव्ह न्युज

02 October 2020

शिक्षकाविरोधात चंदगड पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल

चंदगड / प्रतिनिधी

        ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथील मामासाहेब लाड विद्यालयातील शिक्षक विठोबा रामचंद्र पाटील (रा. होसुर, ता.चंदगड) याच्या विरोधात शाळेतील एका विद्यार्थ्यानीचा विनयभंग केल्याप्रकरणी चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

        यासंदर्भात पोलिसातून मिळालेली माहीती अशी की, ढोलगरवाडी येथील मामासाहेब लाड विद्यालयातील शिक्षक विठोबा रामचंद्र पाटील यांनी जानेवारी २०१९ ते ३० जुलै २०१९ दरम्यान  पिडीत विद्यार्थीनीला ग्रंथालयामध्ये  आपल्या जवळ ओढून शरीराला स्पर्श करून अश्लील चाळे करत असल्याचे सी. सी. टि. व्हि फुटेज मध्ये आढळून आले. हे फुटेज पाहिल्या नंतर याबाबत माध्यमिक शिक्षण अधिकारी यांच्याकडे संबंधित शिक्षकाबद्दल अहवाल सादर करण्यात आला होता. याबाबत खातेनिहाय गोपनीय  चौकशी नेमण्यात आली होती. पण आरोपी बाबत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. तसेच संस्थेच्या  संचालक मंडळाने, शिक्षकांनी या कामी विलंब लावल्याने ढोलगरवाडी येथील संजय रामकृष्ण पाटील यांनी चंदगड पोलीसांत फिर्याद नोंदविली आहे. संबंधित शिक्षक विठोबा  रामचंद्र पाटील यांच्यावर  भा. द. वि कलम ३५४ (अ) १ व बालकांचे लैंगिक अत्याचार कायदा २०१२ चा कलम ८ नुसार पोलिसांत  गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास  पोलीस निरीक्षक अशोक सातपुते करत आहेत. 

1 comment:

Unknown said...

इतक्या दिवसानी पोलिसात तक्रार देने म्हणजे द्वेषभावनेमुळे वाटते..

Post a Comment