आजरा तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन व राहुल गांधी यांच्यावर झालेल्या धक्काबुक्कीच्या निषेधार्थ निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

02 October 2020

आजरा तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन व राहुल गांधी यांच्यावर झालेल्या धक्काबुक्कीच्या निषेधार्थ निवेदन

काँग्रेस कार्यकर्त्यांनी तहसीलदार यांना निवेदन देताना रवी भाटले, नगरसेवक किरण कांबळे,शहर अध्यक्ष संजय सावंत, सरचिटणीस नौशाद बुदद्देखान
चंदगड / प्रतिनिधी

२ ऑक्टोबर २०२० गांधी जयंतीचे अवचित्य साधून आणि कोंग्रेसचे पक्ष प्रमुख मा. राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश मध्ये झालेल्या धक्काबुक्की निषेधात्र आज आजारा तालुका कॉंग्रेस तर्फे तहसिलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले॰

भांडवलदार धारजिन भाजपा सरकारने पाशवी बहुमतच्या बळावर असंसदिय पद्धतीने आवाजी मतदानाने पास करून घेतलेल्या कृषि विधेयक व कामगार विरोधी धोरण व कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना   उत्तर प्रदेश सरकारने अपमानस्पद वागणूक दिल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष  व महसुल मंत्री मा. बाळासाहेब थोरात साहेब आणि जिल्हा कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष तथा पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार जिल्हा कॉंग्रेस कमिटी सरचिटनीस विद्याधर गुरबे साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपिता महात्मा गांधी व आदरणीय लाल बहाडूरशास्त्री यांच्या जयंतीचे अवचित्य साधुन आजरा तालुका कोंग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने निषेध व धरणे आंदोलन करण्यात आले.

सुरूवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी व आदरणीय लाल बहाडूरशास्त्री यांच्या फोटोचे पूजन संजय भाऊ सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. भाजप सरकारने नोटबंदी, चुकीची जीएसटी, लोक्क्दौन करून देशाचा विकसदार निच्यांकी केला त्यात शेतकरी विरोधी व कामगार विरोधी विधेयक मंजूर करून कष्टकरी वर्गाचे कंबरडे मोडले आहे. उत्तर प्रदेश मध्ये अत्याचारामध्ये मृत्यू झालेली मुलगी मनीषा हिला न्याय मिळू देण्यासाठी व कुटुंबाची चौकशी करण्यासाठी निघालेल्या मा. राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की करून राष्ट्रीय नेत्याचा अपमान केला आहे याचा आम्ही आजरा तालुक्यातील सर्व कोंग्रेस कार्‍यकर्त्याचा वतीने जाहीर निषेध करून निवेदन देतेवेळी, आजरा राष्ट्रीय कोंग्रेस शहाराध्यक्ष मा. संजय भाऊ सावंत, जिल्हा कोंग्रेस सरचिटणीस नौशाद बुददेखान, नगरसेवक किरण कांबळे, रविंद्र भाटले, अमित खेडेकर, विक्रम पट्टेकर, याया बुड्डेखान, वृशाल हुककेरी, जावेद दिडबाग, रशीद पटाण, NUSI आजरा तालुका उपाध्यक्ष आजिम पटेल व कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment