जनावांरावर हल्ला करणाऱ्या अस्वलाला केले अखेर जेरबंद, अडूरे येथील घटना - चंदगड लाईव्ह न्युज

02 October 2020

जनावांरावर हल्ला करणाऱ्या अस्वलाला केले अखेर जेरबंद, अडूरे येथील घटना

वनविभागाने जेरबंद केलेले अस्वल.

चंदगड / प्रतिनिधी

         अडुरे (ता. चंदगड) येथे रानात चरावयास गेलेल्या  ८ ते १० गाई, म्हशींवर अस्वलाने हल्ला केला. यामध्ये शेतकरी किरकोळ जखमी झाले आहेत. 

      काल सायंकाळी अडुरे येथील जंगलापासून ५० फूटावरून असलेल्या  श्रीमान आण्णा पाटील यांच्या रानात आडुरे येथील काही शेतकरी आपल्या गाई, म्हशी चारवण्यासाठी घेऊन गेले होते. त्याचवेळी अचानक एका अस्वलाने गाई, म्हशींवर हल्ला करण्यास सुरुवात केले. या वेळी बिथरलेल्या जनावरांनीही शिंगानी अस्वलावर  हल्ला केला. शेतकर्यानीही प्रतिकार केला. यामध्ये अस्वल ही जखमी झाले. अस्वल पळून जात असताना श्रीमान पाटील  यांच्या शेतातील घरात शिरले. प्रसंगावधान राखून शेतकर्यानी बाहेरून कडी लावली. आणि चंदगड  वनविभागाला कळवले. दरम्यान प्रभारी वनक्षेत्रपाल दयानंद पाटील यानी जाळी घेऊन घराच्या खिडक्या बंद करून घेतल्या.नंतर कोल्हापूर हुन रेस्कु टीम मागवली. 

         डाॅ. वाळवेकर, प्रदीप सूतार, अमित कुंभार,अक्षय भोई,मतीन बागीलगे,उमेश खबाले या रेस्क्यू  टीम मधील कर्मचार्यानी घराची एक भिंत पाडून अस्वलाला  रात्री उशिरा पिंजऱ्यात बंदीस्त केले.यावेळी वनरक्षक अस्मिता घोरपडे, गुंडू अवेळी,कृष्णा पवार, नितीन नाईक, शंकर गावडे यांनीही अस्वल पकडण्यासाठी सहकार्य केले.




No comments:

Post a Comment