चंदगड येथे शेतकरी व कामगार बचाव साठी केंद्र सरकारच्या विरोधात धरणे आंदोलनप्रसंगी मार्गदर्शन करताना संभाजीराव देसाई |
भांडवलदार धार्जिन भाजपा सरकारने बहुमताच्या जोरावर असंसदीय पद्धतीने आवाजी मतदानाने पास करून घेतलेल्या कृषी विधेयक व कामगार विरोधी कायद्याचा निषेध व संविधानिक मार्गाने विरोध करण्यासाठी आज चंदगड तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील दलित तरुणीवरील अत्याचार आणि खून प्रकरणी पीडित कुटुंबियांच्या भेठीसाठी निघाले असता पोलिसांनी काँग्रेसचे नेते राहुल व प्रियांका गांधी यांना धक्काबुक्की केल्याचा यावेळी निषेध करण्यात आला.
हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस च्या सूचनेनुसार पालकमंत्री सतेज पाटील यांच्या आदेशानुसार आंदोलन करण्यात आले. यावेळी महात्मा गांधींच्या फोटोचे पूजन करण्यात आले. प्रास्तविक जे. व्ही. पाटील यांनी केले. यावेळी संभाजीराव देसाई, नगरसेवक बाळासाहेब हळदणकर, महादेव मंडलिक, महादेव वांद्रे, अभिजित गुरबे, अशोक दाणी, कलिम मदार, प्रसाद वाडकर, जयसिंग पाटील, तात्यासाहेब देसाई, सागर पाटील आदी उपस्थित होते. आभार राजेंद्र परीट यांनी मानले.
No comments:
Post a Comment