भिकू उर्फ कृष्णा कुराडे |
तेऊरवाडी - सी .एल. वृत्तसेवा
मोरेवाडी ( ता. चंदगड) येथील भिकू उर्फ कृष्णा धोडिंबा कुराडे (वय - ८५) यांचे आकस्मित निधन झाले. मोरेवाडीत वारकरी सांप्रदाय रुजवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. तर सलग ४० वर्षे मोरेवाडी ते पंढरपूर पायी वारी करून एक विक्रम प्रस्तापित केला होता. समाजकार्यात अग्रेसर राहून घरोघरी इश्वर भक्तीची ज्योत तेवत ठेवणाऱ्या भिकू कुराडे यांच्या आकास्मित मृत्यूने मोरेवाडी गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, चार बहिणी, एक मुलगा, सुन व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
No comments:
Post a Comment