राधानगरी प्रांत कार्यालयाकडून हेरे सरंजामची कामे अपूर्ण, उपोषणाचा इशारा - चंदगड लाईव्ह न्युज

14 October 2020

राधानगरी प्रांत कार्यालयाकडून हेरे सरंजामची कामे अपूर्ण, उपोषणाचा इशारा

चंदगड / प्रतिनिधी

          हेरे सरंजाम जमिनीची वर्ग-२ ची वर्गवारी एक करण्याबाबत कानूर खुर्द व पुंद्रा या गावातील सुमारे ९४ शेतकऱ्यां पैकी ९१ कामे प्रांत कार्यालय राधानगरी यांच्याकडून पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे हे सर्व शेतकरी राधानगरी प्रांत कार्यालय समोर उपोषण करणार असल्याचे प्रकल्पदाता संघटनेचे राज्य अध्यक्ष भाईसाहेब जंगमहट्टीकर, शेकापचे नेते रविंद्र पाटील,कानुर विभाग शेकापचे सुरेश पांडुरंग पाटील यांनी ही माहीती दिली. 

        १५ ऑगस्ट रोजी चंदगड तहसिल कार्यालय येथे ९४ पैकी ३ शेतकऱ्यांना प्रकरणाची वर्गवारी एक करण्यात आली व ९१ प्रकरणांची जबाबदारी प्रांत कार्यालय राधानगरी यांच्यावर सोपविण्यात आली. काही दिवसांनी याबाबतीत चौकशी करण्यासाठी सुरेश पाटील हे राधानगरी प्रांत कार्यालयात गेले व चौकशी केली असता कामे अपूर्ण असल्याचे समजले आहे. याबद्दल प्रकल्प दाताचे अध्यक्ष भाईसाहेब जंगमहट्टीकर यांना ही माहिती दिली. त्यानंतर त्यांनाही राधानगरी प्रांत कार्यालयात संपर्क साधला व उर्वरित सर्व कामे पूर्ण करण्यासाठी विनंती केली व अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची ही कामे लवकर पूर्ण झाली पाहिजे न झाल्यास प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले जाईल असा इशारा जंगमहट्टीकर व पाटील यांनी दिला आहे.



No comments:

Post a Comment