कालकुंद्री येथे मोफत आरोग्य शिबिरात दीडशे रुग्णांची तपासणी - चंदगड लाईव्ह न्युज

08 October 2020

कालकुंद्री येथे मोफत आरोग्य शिबिरात दीडशे रुग्णांची तपासणी

कालकुंद्री येथे आरोग्य शिबिराचे उद्घाटन करताना प्रशासक बी एम कांबळे सोबत व्ही बी भोगण, ग्रामस्थ व आरोग्य विभागाची टीम.


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

             माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम अंतर्गत ग्रामपंचायत कालकुंद्री व प्राथमिक आरोग्य केंद्र कोवाड यांच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. केंद्रीय प्राथमिक शाळा कालकुंद्री येथे पार पडलेल्या शिबिराचे उद्घाटन ग्रामपंचायत प्रशासक बी एम कांबळे यांनी केले.

         स्वागत व प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी व्ही बी भोगण यांनी केले. या शिबिराचा सुमारे दीडशे रुग्णांनी लाभ घेतला. यावेळी मधुमेह, रक्तदाब आदीसह ऑक्सीजन पातळी, तापमान मोजण्यास सह विविध आजारांची तपासणी व उपचार करण्यात आले. कोवाड प्रा. आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसन्न चौगुले यांनी तपासणी उपचार व मार्गदर्शन केले. त्यांना आरोग्य सहाय्यिका सुनिता नाईक, आरोग्य सेवक संभाजी आगोशे, शैलेश वाघमारे, आरोग्य सेविका अमरावती गावित, रेणुका कांबळे, आशा स्वयंसेविका अंजना पाटील, सुमन सकट, माया पाटील, अंगणवाडी सेविका तुळसा गायकवाड, औषध निर्माता भरत पाटील, प्रयोगशाळा तंत्रज्ञ शालन वरपे, हनुमंत लिंबे आदींचे सहकार्य लाभले. शिबिराच्या यशस्वितेसाठी  माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वे पथकातील अध्यापक एन जे बाचुळकर, स्वयंसेवक अंकिता पाटील, निकिता तेऊरवाडकर, परशुराम जोशी, शिरीष पाटील, गुंडू राजेंद्र पाटील, सुरज पुजारी, विकास पाटील, निवेदिता कांबळे, कांचन कांबळे, शुभम पाटील, विश्राम गावित, लक्ष्मी हुंदरे, ग्रामपंचायत कर्मचारी सागर पाटील, महादेव लोहार, नरसु कांबळे, उदय सुतार आदींनी परिश्रम घेतले. यावेळी कोरोना दक्षता कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते. आभार व्ही बी भोगण यांनी मानले.

No comments:

Post a Comment