ज्येष्ठ नागरिक चळवळीतील चार कार्यकर्त्यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

08 October 2020

ज्येष्ठ नागरिक चळवळीतील चार कार्यकर्त्यांचे निधन

तुकाराम झाजरी       नामदेव लोहार        विष्णू पाटील     तुकाराम हिशेबकर

कालकुंद्री : वृत्तसेवा

          चंदगड तालुक्यात सन २०१२ मध्ये ज्येष्ठ नागरिक चळवळ सुरु झाली. तेव्हा पासून गावागावांत संघटना बांधणी कामी धडपडणाऱ्या चार कार्यकर्त्यांचे गेल्या काही दिवसात निधन झाल्याची माहिती ज्येष्ठ नागरिक महासंघाचे (फेस्कॉम) कोल्हापूरचे सहसचिव सोमनाथ गवस (चंदगड) यांनी दिली. यात तुकाराम बाबू झाजरी- तुडये, नामदेव रामचंद्र लोहार- चंदगड, विष्णू लक्ष्मण पाटील- खालसा कोळींद्रे, तुकाराम यशवंत हिशेबकर (गुरुजी)- कडलगे बुद्रुक यांचा समावेश आहे. चारही कार्यकत्यांनी तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या उन्नतीसाठी अविरत मेहनत घेतली. राज्यस्तरीय अधिवेशन यशस्वी करणे, गावोगावी ज्येष्ठांसाठी आरोग्य तपासणी, प्रबोधन शिबिरे भरवणे, त्यांचे जीवनमान उंचावणे अन्यायाविरुद्ध लढा देत हक्कांसाठी झगडणे यात त्यांचा मोठा वाटा होता. प्रत्येक ज्येष्ठ नागरिक आमच्यासाठी लाख मोलाचा असल्यामुळे कोरोना महामारीच्या काळात ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर न पडता घरीच सुरक्षित राहावे. असे आवाहन सोमनाथ गवस यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment