अडकूर येथे दिव्यांगानी मानले ग्रामपंचायतीचे आभार? - चंदगड लाईव्ह न्युज

30 October 2020

अडकूर येथे दिव्यांगानी मानले ग्रामपंचायतीचे आभार?

अडकूर (ता. चंदगड) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांगाना जाॅब कार्डचे वितरना करताना पदाधिकारी.

तेऊरवाडी - सी. एल. वृत्तसेवा

     अडकूर (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्य व कर्मचारी या सर्वानी मिळून गावातील दिव्यांगाना  ५ % अनुदानाचे वाटप केले. याबरोबरच या सर्वाना जॉब कार्डचेही आज वितरण करण्यात आले. यामुळे आनंदित झालेल्या अडकूरच्या सर्व दिव्यांगानी ग्रामपंचायतीचे आभार मानून ऋण  व्यक्त केले.

   यावेळी सरपंच श्रीमती यशोधा कांबळे, सदस्या उषा आर्दाळकर, सौ. सुमन होनगेकर, सदस्य बंडू चंदगडकर, सुमन शिवनगेकर, ग्रामसेवक एम. ए. सोनार, धोंडिबा कांबळे, श्रीकांत रावराणे, ग्रामपंचायत क्लार्क सौ. शिरीन शेख, ग्रामपंचायत शिपाई तानाजी कांबळे, श्रीकांत देसाई, चंद्रकांत इंगवले, संदिप देसाई, जयवंत देसाई, बस्त्याव गॉडद व दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष राहूल आपटेकर व त्यांचे सहकारी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment