दौलत कामगारांचे काम बंद आंदोलन बैठकीनंतर मागे, गाळपास सुरवात - चंदगड लाईव्ह न्युज

31 October 2020

दौलत कामगारांचे काम बंद आंदोलन बैठकीनंतर मागे, गाळपास सुरवात

दौलत कारखान्याचे संग्रहित छायाचित्र

चंदगड / प्रतिनिधी  

        दौलत (अथर्व) साखर कारखाना व्यवस्थापन व कामगार यांच्यातील वाद अखेर मिटला असून झालेल्या बैठकीत समाधानकारक तोडगा निघाला. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून कारखान्याच्या गळीत हंगाम कामकाजावर निर्माण झालेले अनिश्चिंततेच सावट अखेर दूर झाले आहे,तालुक्यात ऊसतोडणी जोरात सूरवात झाली आहे. दौलत कामगारांनी आपले काम बंद आंदोलन मागे घेतले असून आजपासून कारखाना चालू झाला आहे व गळीत हंगामाला सुरुवात झाली आहे. अँड. संतोष मळवीकर, विक्रीकर अधिकारी गोपाळ पाटील, गोपाळराव पाटील यांच्या प्रयत्नाला यश आल्याने शेतकरी, वाहतूकदार,, तोडणी कामगार याच्यांत समाधान व्यक्त होत आहे.

       आज सकाळी हलकर्णी येथील कॉलेज वर कामगारांनी मेळावा घेतला त्या मेळाव्यात अँड. संतोष मळविकर, गोपाळ पाटील यांनी कारखाना व्यवस्थापण आणि कामगार यांच्यात मध्यस्थी करत आपले विचार सर्वांसमोर ठेवले.प्रदीप पवार, अनिल होडगे, अशोक गावडे या कामगारांनी आपल्या व्यथा मांडल्या. कारखान्याचे मार्गदर्शक गोपाळराव पाटील, अथर्व-दौलतचे अध्यक्ष मानसिंग खोराटे, अँड.मळविकर, गोपाळ पाटील , प्रभाकर खांडेकर यांच्या दोन वेळच्या  बैठकीनंतर कामगार आणि कंपनी मध्ये  संध्या 6 वाजता सर्व हेवेदावे विसरून सर्वांच्या हितासाठी

        एकोप्याने कामकाज केले तरच सर्वांचे भले आहे, एकजुटीने राहुन कारखाना जोमाने सुरु करण्याचे ठरले.पोलीस केसेस मागे घेणे , कामगार व कारखाना व्यवस्थापन याच्यांत सलोख्याचे सबंध ठेवणे अशा अटींसह कामगार कामावर हजर झाले.एकंदरीत कारखाना चालू झाल्याने शेतकरी, कामगार, आणि तोडणीवाहतुकदार समाधान व्यक्त होत आहे.

         


No comments:

Post a Comment