संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हास्तरीय किल्ला बांधणी स्पर्धांचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

01 November 2020

संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हास्तरीय किल्ला बांधणी स्पर्धांचे आयोजन

किल्यांचे संग्रहित छायाचित्र ( श्रीकांत पाटील, कालकुंद्री)

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

         संभाजी ब्रिगेड कोल्हापूर जिल्हा यांच्यावतीने यंदाच्या दिवाळीत बालचमू आणि तरुण मंडळांसाठी जिल्हास्तरीय किल्ले बांधणी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. एकूण ५१ हजार रोख रुपये किमतीची बक्षिसे असून स्पर्धांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. सामूहिक खुला गट प्रथम क्रमांक- ११ हजार, द्वितीय क्रमांक- ५ हजार, तृतीय क्रमांक- २ हजार व सन्मान चिन्हे. ६ ते १२ वयोगट वैयक्तिक किंवा सामूहिक किल्ले बांधणी प्रथम क्रमांक- ३ हजार, द्वितीय क्रमांक- २ हजार, तृतीय क्रमांक- ३ हजार व सन्मान चिन्हे, अशी बक्षिसी असून प्रवेश फी खुला गट- दोनशे रुपये, लहान गट शंभर रुपये आहे.

         बांधणी केलेले किल्ले महाराष्ट्रातीलच असावेत, शिवकालीन बांधणी असावी, रेडीमेड किल्ले नसावेत, बनवणाऱ्याला किल्ल्याची संपूर्ण ऐतिहासिक माहिती असावी, या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या प्रत्येक मंडळाला प्रमाणपत्र आणि बक्षिसे दिली जाणार आहेत. कोल्हापूर शहर व बारा तालुक्यात नोंदणी होणार आहे. नाव नोंदणीसाठी संपर्क कोल्हापूर शहर- 7038641001,  9860131338, 9623363852, 9764931775. चंदगड, आजरा, गडहिंग्लज- 9011008541. पन्हाळा, शाहूवाडी- 9552778580.  गगनबावडा- 9096840461.  हातकणंगले- 9158475198.  शिरोळ- 9325701509. कागल- 9923519149. राधानगरी, भुदरगड- 7058560957. करवीर- 9595905751, नोंदणीसाठी वरील दूरध्वनी क्रमांकावर ७ नोव्हेंबर पूर्वी नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांनी केले आहे. गेल्या काही वर्षात तालुका व जिल्हास्तरीय किल्ला स्पर्धांचे आयोजन करावे अशी मागणी होती. संभाजी ब्रिगेडने ती संधी व बाल चमुंच्या कल्पकतेला वाव उपलब्ध करून दिला आहे. याचा अधिकाधिक प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहनही रुपेश पाटील यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment