विजय पाटील |
कोल्हापूर येथील आय. एस. ओ . 9001:2015 मानांकित, उत्कृष्ट अभियंता पुरस्कार प्राप्त चार्टर्ड सिव्हिल इंजिनिअर व गव्ह. रजिस्टर्ड व्हॅल्युअर विजय पाटील यांना सिव्हिल इंजिनिअरिंग मधील पीएचडी प्राप्त झाली आहे.
त्यांनी 'स्टडी अनालेसिस अँड ऑप्टिमायझेंशन ऑफ अव्हेलेबल वॉटर इन कोल्हापूर डिस्ट्रिक्ट' हा शोध प्रबंध सादर केला होता. शोध प्रबन्ध आणि सिविल इंजिनिअररिंग मधील योगदानाबद्दल त्यांना नॉर्थ ऑस्ट्रेलिया येथील कॉमन वेल्थ युनिव्हर्सिटी ने पी एच डी जाहीर केली. त्यांना यापूर्वी "इन्स्टिट्युट ऑफ स्कॉलर्स" या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून "रिसर्च एक्सलंस अवॉर्ड " ने सन्मानित केले आहे. २८ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे पदवी वितरण होणार आहे.
No comments:
Post a Comment