मुंबई-डिलाईल रोड येथे कर्नाटक शासनाचा निषेध, काळ्या फिती बांधून घोषणाबाजी - चंदगड लाईव्ह न्युज

01 November 2020

मुंबई-डिलाईल रोड येथे कर्नाटक शासनाचा निषेध, काळ्या फिती बांधून घोषणाबाजी

मुंबई : काळा दिनानिमित्त निषेध व्यक्त करताना भरमू नांगनूरकर व अन्य मान्यवर.

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

         मुंबई येथील डिलाईल रोड, ना. म. जोशी मार्ग, श्रमिक जिमखाना मैदानवर सीमा संघर्ष समन्वय समितीकडून रविवारी काळा दिनानिमित्त हरताळ पाळून कर्नाटक सरकारचा निषेध केला. 'बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे' या मागणीसाठी काळी फित बांधून, घोषणा देत दडपशाही केलेल्या कर्नाटक सरकारचा निषेध करत आंदोलन करण्यात आले.

        बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून बेळगाव व सीमाभागात १ नोव्हेंबर ला काळा दिवस पाळला जातो. याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सीमाभागवासी व मराठी बांधवाकडून काळ्या फिती बांधून घोषणाबाजी करत सीमाभागातील झालेल्या दडपशाहीचा निषेध केला.  या सीमाभागाच्या लढ्यासाठी अनेकांनी बलिदान, सर्वस्व देऊन हा लढा तेजोमेय ठेवला आहे. त्यामुळे त्यांना श्रध्दांजली ही वाहिली. सीमा समन्वय समितीचे सदस्य भरमु नांगनूरकर, पिराजी पाटील, एम. जे. पाटील, प्रदीप चौगुले, लक्ष्मण गावडे, धोंडिबा दळवी, संदीप खवरे, गणेश दस्ते, गणपत गावडे, गंगाराम गावडे, रमेश पाटील, मधुकर पाटील, राणबा देशवळ आदी मराठी बांधव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment