हेमरस आठ नोव्हेंबर 2020 ला सूरू होणार - भरत कूंडल यांची माहीती - चंदगड लाईव्ह न्युज

02 November 2020

हेमरस आठ नोव्हेंबर 2020 ला सूरू होणार - भरत कूंडल यांची माहीती

ओलम शुगर (हेमरस) चे संग्रहित छायाचित्र

चंदगड / प्रतिनिधी 

        राजगोळी खुर्द (ता.चंदगड) येथील ओलम (हेमरस) साखर कारखाना ८नोव्हेंबर ला सुरु होणार असल्याची माहिती कारखान्याचे बिझनेस हेड भरत कूडंल यांनी दिली.यंत्रात तांत्रिक बिगाड झाल्याने हंगाम नियोजित वेळेत सुरू झाला नव्हता, पण दुरूस्ती चे काम पूर्ण झाले आहे.

         गतवर्षी 10 नोव्हेंबरला कारखाना सुरू झाला होता. या वर्षी 13 ऑक्टोबरला मोळी पूजन झाल्यानंतर 25 ऑक्टोबरपर्यंत कारखाना सुरू करण्याचे नियोजन होते. पण, यंत्रात अचानक तांत्रिक बिगाड झाल्याने नियोजित वेळेत कारखाना सुरू होऊ शकला नाही. शेजारचे कारखाने सुरू झाल्याने संभ्रमावसतेत असलेल्या शेतकऱ्यांकडून कारखाना सुरू करण्याबाबत सतत विचारना होत आहे. दरवर्षी कारखाना अखंडपणे सुरू राहत असल्याने हंगामात ऊसाचे वेळेवर गाळप झाले आहे. ऊस बिले व तोडणी, वाहतुकीची बिले वेळेवर आदा केल्याने यंदा मोठ्या संख्येने   ऊस नोंद झाली.

          यावर्षी साडेसहा लाख टन गाळपाचे उद्दिष्ट् आहे. एफआरपी प्रतिटन 2985 असल्याने ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना सर्वाधीक दर मिळणार आहे. संपूर्ण ऊसाची तोड झाल्याशिवाय हेमरसचा हंगाम थांबणार नाही. त्यामुळे ऊस उत्पादकांनी हेमरसला जास्तीत जास्त ऊस पुरवठा करून सहकार्य करावे असे आवाहन कुंडल यांनी केले.No comments:

Post a Comment