चंदगडच्या शिष्टमंडळाने घेतली पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट, शववाहिकेची केली मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

02 November 2020

चंदगडच्या शिष्टमंडळाने घेतली पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट, शववाहिकेची केली मागणी

चंदगड शहराच्या मागण्यासाठी चंदगड येथील शिष्टमंडळाने घेतली पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट. 

चंदगड / प्रतिनिधी

        चंदगड तालुका व चंदगड शहर विकासासाठी भरीव निधी मिळावा.या मागणीसाठी चंदगड पंचायत समिती व चंदगड नगरपंचायतीच्या पदाधिकार्यानी कोल्हापूर येथे गृह राज्य मंत्री तथा पालक मंत्री सतेज पाटील यांची भेट घेऊन विविध मागण्याांचे निवेदन देण्यात आले. 

        चंदगड शहरासाठी शववाहिका उपलब्ध व्हावी , चंदगड तालुक्यातील रस्ता दुरूस्तीसाठी विशेष निधी मिळावा , चंदगड शहरासाठी आंतर्गत रस्ते व गटर्ससाठी निधी मिळावा , चंदगड तालुक्यात ओला दुष्काळ जाहिर करून शेतक - यांना सत्वर नुकसान भरपाई मिळावी , चंदगड तालुक्यातील सर्व शासकिय विभागतील रिक्त पदे भरणेत यावी अशा विविध मागण्या मंत्री  सतेज पाटील यांच्याकडे करण्यात आल्या आहेत .या शिष्टमंडळात सभापती अॅड अनंत कांबळे, उपसभापती सौ.मनिषा शिवणगेकर ,पं.स.सदस्य बबन देसाई , जगन्नाथ हुलजी , दयानंद काणेकर , सौ . नंदिनी पाटील , सौ.विठाबाई मुरकूटे ,व सौ.रूपा खांडेकर, उप नगराध्यक्ष फिरोज मुल्ला , नगरसेवक झाकिर नाईक , अभिजित गुरबे  विलास पाटील ,माजी जि.प.सदस्य  राजेंद्र परीट , संजय चंदगडकर , कलीम मदार अशोक दाणी आदीचा शिष्ट मंडळात समावेश होता.
No comments:

Post a Comment