शिवाजी विद्यापीठाच्या शिनोळी येथील उपकेंद्रामध्ये रोजगारभिमुख कोर्स सुरु करण्याबाबत आमदार राजेश पाटील यांची मंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

02 November 2020

शिवाजी विद्यापीठाच्या शिनोळी येथील उपकेंद्रामध्ये रोजगारभिमुख कोर्स सुरु करण्याबाबत आमदार राजेश पाटील यांची मंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी शिवाजी विद्यापीठाच्या शिनोळी येथील उपकेंद्रासंदर्भात चर्चा करताना आमदार राजेश पाटील.

तेऊरवाडी - संजय पाटील

        शिवाजी विद्यापीठाच्या शिनोळी (ता. चंदगड) येथील उपकेंद्रामध्ये रोजगाराच्या दृष्टीने कोर्सेस सुरु करणेबाबत कोल्हापूर येथील भेटीतील चर्चेत चंदगड विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत याना विविध शैक्षणिक मागण्यांचे निवेदन दिले

      सीमाभागातील विद्यार्थ्याकरीता महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे  व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांचे संकल्पनेतून शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सीमाभागात सुरु करावयाचा जो निर्णय घेतला त्याबद्दल चंदगड विधानसभेचा लोकप्रतिनीधी म्हणून  महाआघाडी सरकारचे आमदार राजेश पाटील यानी  सर्वप्रथम आभार मानले . सिमा भागात शिवाजी विद्यापीठाच्या या नव्याने सुरु होणाऱ्या उपकेंद्राकरीता विद्यार्थ्याच्या रोजगाराकरीता खालील अभ्यासक्रमांचा यामध्ये समावेश असणे गरजेचे असल्याचे मत आमदार पाटील यानी उदय सामंत यांच्यासमोर व्यक्त केले.              यामध्ये बीएससी इन नर्सिग , बीव्हीएससी अॅन्ड एएच . डिफार्म , बीफार्म , एमफार्म , इंजिनिअरिंग डिप्लोमा , कॉम्प्युटरमधील कोर्सेस , डीओईएसीसी " ओ लेवल , डिप्लोमा इन ऍडव्हान्स्ड सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी , सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर ऐप्लिकेशन , सर्टिफिकेट इन कॉम्प्युटिंग , सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर प्रोग्रामिंग , कॉम्प्युटर एप्लिकेशन , वेब डिझाईनिंग एण्ड वेब डेव्हलपमेंट , कॉम्प्युटर ऑपरेटर ऍण्ड प्रोग्रॅम असिस्टन्स , डिप्लोमा इन ऐडव्हर्टायझिंग एण्ड ग्राफिक डिझाईनिंग , गेम डिझाईन ऐण्ड डेवलपमेंट , प्रिंट इमेजिंग ऍण्ड पब्लिशिंग , कार्टून ऐनिमेशन , ई - कॉम डेव्हलपमेंट , वेब ग्राफिक्स एण्ड एनिमेशन , कॉम्प्युटर ऑपरेटर ऍण्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट , डेस्क टॉप पब्लिशिंग ऑपरेटर , रोजगाराभिमुख कोसेंस - डिप्लोमा इन प्लॅस्टिक मोल्ड टेक्नॉलॉजी , उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण , सेक्रेटरीअल प्रैक्टिस . फॅशन टेक्नॉलॉजी , मॉडर्न ऑफिस प्रैक्टिस , हॉस्पिटॅलिटी ऍण्ड टुरिझम , टूरिस्ट गाइड . डिप्लोमा इन फूड ऐण्ड बव्हरेज सदिस , बेसिक कोर्स ऑन ट्रॅव्हल फेअर ऍण्ड टिकेटिंग बेसिक कोर्स इन कॉम्प्युटराइज्ड रिझव्हंशन सिस्टम ( एअर टिकेटिंग ) डिजिटल फोटोग्राफी , स्टोअर कीपिंग एण्ड पर्चेसिंग , सेल्स एण्ड अकाउंटन्सी . बांधकाम व्यवसाय कोसेंस , एमएससी , एमबीए , एमसीए , एमपीएम इत्यादी . बीएससी ( ऍग्रो ) . एमएससी ( ऐना ) , एलएलबी , बीएसएल , एलएलएम , डीए , बीबीए , बीसीए , बीबीएम एमबीए , एमपीएम , एमसीए फॉरेन लँग्वेज ( जर्मन , फ्रेंच , रशियन , स्पॅनिश , चायनीज , जॅपनीज , कोरियन ) हॉटेल मॅनेजमेंट एण्ड केटरिंग , डिप्लोमा इन बेकरी एण्ड कॉन्फेक्शनरी , डिप्लोमा , क्राफ्ट कोर्स इन फूड प्रॉडक्शन आदी तत्सम कोसेंस विद्याथ्यांना त्यांच्या स्वत : च्या पायावर उभे राहणेकरीता तसेच त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होणेचेदृष्टीने शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्रामध्ये सुरु करणेबाबत आग्रहाची विनंती करणारे पत्र आमदार राजेश पाटील यानी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत याना दिले. याला सकारात्मक प्रतिसाद मंत्री सामंत यांनी दिल्याने सिमा भागात विशेषतः चंदगड मतदार संघात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

No comments:

Post a Comment