चंदगड पं स.कडील रिक्त पदे भरण्याबरोबर तालूक्यातील ईतर विषयावर जि प चे सीईओ अमन मित्तल यांचेशी चर्चा करताना आम राजेश पाटील, सभापती अॅड अनंत कांबळे, उपसभापती मनिषा शिवनगेकर,गटविकास अधिकारी बोडरे आदी |
चंदगड / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांची काल आमदार राजेश पाटील यांच्या समवेत पंचायत समिती सभापती अॅड.अनंत कांबळे , उपसभापतीसो सौ . मनिषा शिवणगेकर व पंचायत समिती सदस्य नगरपंचायतीचे नगरसेवक यांनी भेट घेऊन विविध विकास कामे व रिक्त जागा बाबतचर्चा केली.
चंदगड तालुका हा ग्रामीण डोंगराळ वाडी - वस्तीचा आहे .कोल्हापूर पासून १५० कि.मी. अंतरावर आहे भौगोलीक दृष्टया मोठा आहे .पंचायत समिती कडील अनेक विभागातील पदे रिक्त आहेत . शिक्षण , आरोग्य , ग्रामपंचायत , महिला व बाल विकास , पशुसंवर्धन इतर विभागातील रिक्त पदे सत्वर भरावीत पं.स.कडील प्रतिनियुक्त्या रदद कराव्यात पं.स.ची जुनी इमारत चंदगड नगरपंचायतीला तात्पुरती नाममात्र भाड्याने देण्यास परवानगी द्यावी , पंचायत समितीसाठी जादा सादिलवार अनुदान मिळावे व निलंबित कर्मचा-यांची नेमणूक पंचायत समिती चंदगडकडे करू नये तसेच चंदगड ग्रामपंचायतीचा चौदावा वित्त आयोग निधी चंदगड नगर पंचायतीला वापरण्यास परवानगी मिळावी अशा विविध मागण्या सीईओ अमन मित्तल यांच्याकडे करण्यात आल्या.याावेळी पं.स.सदस्य बबन देसाई , जगन्नाथ हुलजी , दयानंद काणेकर , सौ . नंदिनी पाटील सौ.विठाबाई मुरकूटे , सौ रूपा खांडेकर , गट विकास अधिकारी चंद्रकांत बोडरे , सहाय्यक विकास गट विकास अधिकारी संताष जाधव, उप नगराध्यक्ष फिरोज नगरसेवक झाकिर नाईक , अभिजित गुरबे , विलास पाटील , माजी जि.प.सदस्य राजेंद्र परीट , संजय चंदगडकर , कलीम मदार अशोक दाणी आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment