चंदगड तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींचे आरक्षण व अंतिम प्रभार रचना जाहीर - चंदगड लाईव्ह न्युज

02 November 2020

चंदगड तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींचे आरक्षण व अंतिम प्रभार रचना जाहीर


चंदगड / प्रतिनिधी 

    चंदगड तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार अंतिम प्रभाग रचना व आरक्षण जाहीर करण्यात आले आले असून त्याबाबत ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयास जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सूचित करण्यात आले आहे.
    जुलै २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या आरक्षण व प्रभाग रचनेबाबत मार्च महिन्यात सोडत काढून त्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चंदगड तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींच्या निवडणूक स्थगित करण्यात येऊन प्रशासक नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने अनलॉकनंतर आता तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसंदर्भात पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अंतिम प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्याबाबत सदर ग्रामपंचायतींना सूचित करण्यात आले असून कार्यालयात प्रसिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


1 comment:

Post a Comment