तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
१५ ऑक्टोबर हा भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ' वाचन प्रेरणा दिवस ' म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाच्या वतीने विद्यार्थी अभिवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा इ. पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी या गटांमध्ये असून पहिल्या पाच क्रमांकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.विद्यार्थांनी आपल्या इयत्तेतील मराठीच्या पाठयपुस्तकातील दोन मिनिटांचा एक उतारावाचून त्याचा व्हिडीओ करून १५ ऑक्टोबरपूर्वी पाठवावा. या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थांनी सहभाग घ्यावा असे आवाहन अध्यापक संघाचे सचिव एस. पी. पाटील यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment