मंदीरे खुली करण्यासाठी भाजपचे चंदगड येथे रवळनाथ मंदिर आवारात आंदोलन - चंदगड लाईव्ह न्युज

13 October 2020

मंदीरे खुली करण्यासाठी भाजपचे चंदगड येथे रवळनाथ मंदिर आवारात आंदोलन

गोपाळराव पाटील,शांतारामबापू पाटील व भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मंदिर आवारात आंदोलन करतांना

चंदगड / प्रतिनिधी

        कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने बंद ठेवलेली मंदिरे खुली करावीत. या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने चंदगड येथील रवळनाथ मंदिर आवारात आंदोलन करण्यात आले.

       आज महाराष्ट्रभर भाजपाच्या वतीने चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन करणेत आले. त्याचाच एक भाग म्हणून  चंदगड रवळनाथ मंदिर च्या  दारात बसून भा. ज. पा. च्या वतीने बार चालू व मंदिरे बंद असा  निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी  गोपाळराव पाटील यांनी सरकारच्या बेजबाबदार वागण्याची व्यथा मांडली. तर माजी पं. स. सभापती शांताराम पाटील  यांनी "उध्दवा अजब तुझे सरकार "असे मत व्यक्त केले. संदीप नांदावडेकर, नितीन फाटक, राजू पाटील, रत्नप्रभा देसाई यांनी आपल्या शब्दात आक्रोश करत सरकारचा निषेध केला. मंदिर खुली न केल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी  चंदगड भाजपचे पदाधिकारी  उपस्थित होते.


No comments:

Post a Comment