वाचन प्रेरणा दिनानिमित्त कालकुंद्री येथील निबंध स्पर्धेस मोठा प्रतिसाद - चंदगड लाईव्ह न्युज

16 October 2020

वाचन प्रेरणा दिनानिमित्त कालकुंद्री येथील निबंध स्पर्धेस मोठा प्रतिसाद

संदीप पाटील यांचेकडून देणगीचा धनादेश स्वीकारताना वाचनालयाचे पदाधिकारी.

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

        ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय कालकुंद्री  (ता. चंदगड) मार्फत वाचनप्रेरणा दिनाचे औचित्य साधून खुल्या गटात "मला आवडलेले पुस्तक"  या विषयावर   घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेस मोठा प्रतिसाद मिळाला. बक्षीस वितरण के जे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. स्वागत विलास शेटजी व प्रास्ताविक व्ही आर पाटील यांनी केले.

        स्पर्धेतील विजेते अनुक्रमे पुढीलप्रमाणे मानसिंग राजाराम पाटील. प्रशांत राणोजी कोकितकर. सुशांत राजाराम पाटील. मोहन गुरुनाथ कांबळे. ऋतुजा रवळू बागिलगेकर. समिक्षा विठोबा मुंगूरकर. श्रावणी परशराम कडोलकर. शर्वरी आप्पाजी पाटील. सर्व विजेत्यांना चषक, रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

          याशिवाय मुकुंद एकनाथ भेलके  (पुणे) यांनी १७० पुस्तके व संदीप यल्लापा पाटील (जैनगावडे) यांनी  वाचनालयास  रु. ५००० रोख देणगी दिल्याबद्दल तसेच स्पर्धा बक्षीस देणगीदार  राजाराम तुकाराम जोशी, प्रा. व्ही. आर. पाटील, विलास वसंत शेटजी, युवराज कल्लापा पाटील आदींना सन्मानीत करण्यात आले. 

         स्पर्धेचे परीक्षण जी आर कांबळे, अध्यापक कागणी हायस्कूल यांनी केले. यावेळी झेविअर क्रुझ, आप्पाजी पाटील, विठोबा मुंगूरकर अजित खवणेवाडकर,युवराज पाटील, प्रशांत कोकितकर, सुशांत पाटील यांची मनोगते झाली. यावेळी नारायण गावडु पाटील, रामचंद्र सुतार, गजानन विठोबा पाटील, विनायक शि.पाटील, रवळू बागिलगेकर, सचिन पाटील. दिलीप पाटील ,अजित खवणेवाडकर आदी उपस्थित होते. परशराम कडोलकर यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment