नागवे एसटी बस सुरू करा, आगार प्रमुखाकडे निवेदनातून ग्रामस्थांची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

15 October 2020

नागवे एसटी बस सुरू करा, आगार प्रमुखाकडे निवेदनातून ग्रामस्थांची मागणी

चंदगड ते नागवे बस सुरु करण्यासाठीचे निवेदन चंदगड आगारामध्ये देतानाअनंत पेडणेकर व चंदगड नगरपंचायतीचे नगरसेवक आनंदा उर्फ बाळासाहेब हळदणकर.  


चंदगड / प्रतिनिधी

         चंदगड आगारातून चंदगड ते नागवे ही एस टी बस सुरू करण्यासाठी आज ग्रामस्थांच्या वतीने अनंत पेडणेकर व चंदगड नगरपंचायतीचे नगरसेवक आनंदा उर्फ बाळासाहेब हळदणकर यांनी आगार प्रमुखांना निवेदन दिले.                

         निवेदनात म्हटले आहे की, सद्या कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर चंदगड तालुक्यात ठिकठिकाणी धावणाऱ्या बसेसच्या फेऱ्या बंद ठेवलेल्या होत्या. पण आता काही ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आता चंदगड ते नागवे ही एस टी बस सुरू करण्यात यावी. कारण वेगवेगळ्या कारणांमुळे गावातील लोकांना परगावी ये-जा करावे लागते. नागवे गाव आडवळणी आहे. त्यामुळे लोकांची मोठी अडचण होत आहे. एसटी महामंडळाच्या चंदगड आगारातून चंदगड ते नागवे ही एस टी बस सुरू करण्यात यावी. या  मागणीचे निवेदन नागवे ग्रामस्थांच्या वतीने अनंत पेडणेकर यांनी आगार प्रमुखांना दिले. यावेळी चंदगड नगरपंचायत चे नगरसेवक आनंदा उर्फ बाळासाहेब हळदणकर हे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment