विलास पाटील यांना सुपर थर्टी टीचर्स ॲवार्ड - चंदगड लाईव्ह न्युज

06 October 2020

विलास पाटील यांना सुपर थर्टी टीचर्स ॲवार्ड

विलास शंकर पाटील

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

       मराठी विद्यामंदिर किणी शाळेचे अध्यापक विलास शंकर पाटील (कडलगे बुद्रुक, ता. चंदगड) यांना सुपर-३० टीचर्स अवार्ड प्राप्त झाला आहे. शिवशाहू प्रतिष्ठान शाहुवाडी यांच्यामार्फत दिला जाणारा हा मानाचा पुरस्कार विलास पाटील यांच्या कोरोना काळातील शिक्षक, मुख्याध्यापक यांच्या ऑनलाइन बैठका, प्रशिक्षण, त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अध्यापन व कार्यालयीन ऑनलाइन केली जाणारी कामे यातील मोठे योगदान लक्षात घेऊन प्रदान करण्यात आला आहे. याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment