बंद घराचे दरवाजाचे कुलूप तोडून १ लाख ५६ हजारांची घरफोडी केल्याची घटना चंदगड येथील रवळनाथ कॉलनी येथे काल घडली. याप्रकरणी रवींद्र तुकाराम सावंत (वय ४२, शिक्षक, रवळनाथ कॉलनी, चंदगड) यांनी अज्ञाताविरोधात चंदगड पोलिसात तक्रार दिली असून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविंद्र सावंत हे दोन दिवस कामानिमित्त बाहेर गेले होते. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांने घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील लोखंडी कपाटाचा दरवाजा व लॉकर तोडून सोन्याचे गंठन, अंगठी, चेन, कुडे-झुबे यासह ४० हजारांची रोख, सॅमसंग कंपनीचा टॅब असा एकूण १ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.
कोरोनाच्या काळात सर्व्हे करण्यासाठी आरोग्य सेवकांना दिलेला टॅबही चोरट्याने गायब केला. अज्ञाता चोरट्याविरोधात चंदगड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास स. पो. उपनिरीक्षक आर. जे पाटील करत आहेत.
No comments:
Post a Comment