माणगांव येथील शिवसैनिकाचे आंदोलन यशस्वी - चंदगड लाईव्ह न्युज

07 October 2020

माणगांव येथील शिवसैनिकाचे आंदोलन यशस्वी

ताम्रपर्णी नदीवरील माणगाव जवळील पूल वरील नवीन लोखंडी संवरक्षण कठडा

चंदगड / प्रतिनिधी

          मागच्या वर्षी अतिवृष्टी आणि महापुरा मुळे झालेल्या नुकसानीमध्ये ताम्रपर्णी नदीचा लोखंडी संरक्षण कठडा मोडून वाहून गेला होता. त्यामुळे माणगाव मधून ये-जा करणाऱ्यांच्या सुरक्षेसाठी  शिवसेना शाखा माणगावच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले होते. पाटबंधारे विभागाला देखील कळवले होते. त्याचीच दखल घेत पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी बी. एम. पाटोळे आणि पाटबंधारे विभागाचे तुर्केवाडी शाखाधिकारी पी. एम. अर्जुंनवाडकर यांनी तातडीने कारवाई करून लोखंडी संरक्षण कठडा उभारला. त्यामुळे माणगाव येथील शिवसैनिकांच्या आंदोलनाला यश आले आहे.  

No comments:

Post a Comment