चंदगडच्या कर्यात भागात शेतकऱ्यांची सुगी व पेरणीसाठी एकच तारांबळ - चंदगड लाईव्ह न्युज

07 October 2020

चंदगडच्या कर्यात भागात शेतकऱ्यांची सुगी व पेरणीसाठी एकच तारांबळ

तेऊरवाडी येथे टिकावाच्या साह्याने भूईमूग काढताना एक शेतकरी.

तेऊरवाडी / सी . एल . वृत्तसेवा

        सध्या चंदगड तालूक्यातील कर्यात भागात सुगीचा हंगाम जोरात चालू आहे. काही दिवसाआड परतीचा पाऊसही हजेरी लावत असल्याने सोयाबिन, भूईमूग आदि पिकांची सुगी करताना शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडत आहे.

        कर्यात भागातील तेऊरवाडी ,निटूर , मलतवाडी , किणी , कालकुंद्री, राजगोळी आदि परिसरात सोयाबिन तसेच भूईमूग पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते .सध्या या दोन्ही पिकांची काढणी मोठ्या वेगात चालू आहे . या परिसरात ही दोन्ही पिके काढणीनंतर शाळू पिक पेरले जाते . ज्या शेतकऱ्यांची काढणी झाली आहे असे शेतकरी पेरणीच्या कामात गुंतले आहेत .गोकुळ दुध संस्थामध्ये  अनुदानावर मालदांडी शाळूचे बियाणे उपलब्ध करून देण्यात आले असल्याने शेतकऱ्यांची मोठी सोय झाली आहे . दर वर्षीपेक्षा भईमूग काढणी खूपच जड जात असल्याने काही शेतकरी टिकावाच्या साह्याने भईमूग काढतानाचे चित्र दिसून येत आहे. भुईमूगाचा  केवळ वेल हातात आणि शेंगा मात्र जमिमित राहत असल्याने शेतकऱ्यासमोर अडचण निर्माण झाली आहे . तर सोयाबिनाच्या मळणी यंत्राचा दर पोत्याला ३०० रूपये केल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे . तर ज्यांचे सोयाबीन व भूईमूग काढून झालेत असे शेतकरी पेरणी करून पावसाची वाट पाहत आहेत .भात कापणी मात्र पुढील १५ दिवसात चालू होणार आहे.

No comments:

Post a Comment