धोबी समाजाने जनगणना मोहिमेत पुढाकार घ्यावा - सागर परीट यांचे आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

08 October 2020

धोबी समाजाने जनगणना मोहिमेत पुढाकार घ्यावा - सागर परीट यांचे आवाहन

 हरळी बु. (ता. गडहिंग्लज) येथे झालेल्या कार्यक्रमात  बोलताना सागर परीट, बसलेल्या  सभापती रुपाली कांबळे,आनंद शिंदे, उदय शिंदे, पंकज पाटील आदी

चंदगड / प्रतिनिधी

    महाराष्ट्र राज्यातील परीट समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील  समाज बांधवांनी जनगणना मोहिमेत पुढाकार घ्यावा.राज्यामध्ये परीट समाजाची जनगणना मोहीम सुरू झाली आहे. या जनगणनेतून आरक्षण मिळवण्यासाठी समाजाची निश्चित अशा स्वरूपाची माहिती सरकार दरबारी पाठवून समाजाला याचा लाभ मिळवून देऊ या असे आवाहन प्रदेश कार्यकारिणीचे कोअर कमिटीचे सदस्य सागर परीट यांनी केले. हरळी बु.ता.गडहिंग्लज  येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गडहिंग्लज पं. स. सभापती रुपाली कांबळे होत्या. प्रारंभी  राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करणात आले.

        यावेळी आजरा, चंदगड, गडहिंग्लज या तालुक्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना निवडपत्रे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्हाध्यक्ष आनंदराव शिंदे यांनी जनगणनेत सर्व समाजबांधवांनी सहभाग घेऊन राज्यात जिल्हयाचे कार्य अग्रेसर ठेवण्याचे आवाहन केले.जिल्हा कार्याध्यक्ष अभिजित सांगावकर यांनी उपस्थित समाज बांधवांना ऑनलाईन जनगणनेच्या स्वरूपाची पूर्ण माहिती दिली.

          जिल्हा उपाध्यक्ष उदय शिंदे, पंकज पाटील, महासचिव अमरसिंह शिंदे यांनी मनोगते व्यक्त केली.  सूत्रसंचालन गडहिंग्लज तालुकाध्यक्ष रामचंद्र परीट यांनी केले. आभार उपाध्यक्ष अभिजित परीट यांनी मानले. यावेळी गडहिंग्लज, आजरा, चंदगड, भुदरगड समाजबांधव उपस्थित होते. कोरोना पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर राखून कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.

No comments:

Post a Comment