पालकमंत्री सतेज पाटील यांचा आज चंदगड तालुक्यातील नुकसान पाहणी दौरा - चंदगड लाईव्ह न्युज

18 October 2020

पालकमंत्री सतेज पाटील यांचा आज चंदगड तालुक्यातील नुकसान पाहणी दौरा

 

                   पालकमंत्री  सतेज उर्फ बंटी डी. पाटील

कोल्हापूर 

गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती व तंत्रज्ञान, माजी सैनिक कल्याण व संसदीय कार्ये राज्यमंत्री तथा पालकमंत्री  सतेज उर्फ बंटी डी. पाटील हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

रविवार दि. 18 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वा. कोल्हापूर येथून हत्तरगी-दड्डी मार्गे दुंडगे, ता. चंदगडकडे प्रयाण, दुपारी 2.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत चंदगड तालुक्यातील अतिवृष्टी, वादळीवारे व ढगफुटीमुळे नुकसान झालेल्या शेती क्षेत्राची पाहणी (दुंडगे, कुदनूर, कालकुंद्री (कागणी मार्गे), हुदळेवाडी, किणी, कोवाड व निट्टूर,) सायंकाळी 5.45 वाजता बेळगांव (कोवाड-उचगांव मार्गे) कोल्हापूरकडे प्रयाण, सायंकाळी 7.45 कोल्हापूर येथे आगमन व राखीव.

No comments:

Post a Comment