![]() |
हेमरस कडून वाहतूक दरात 8 टक्के वाढीचा निर्णय जाहीर करताना बिझनेस हेड भरत कुंडल,केन हेड सुधीर पाटील,एच आर हेड अजीज झुंजाणी अनिल पाटील व वाहतूकदार. |
संजय पाटील / कोवाड सी.एल. वृत्तसेवा
राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील ओलम ऍग्रो इंडिया प्रा.लि.चा ११ वा गळीत हंगाम जोमाने सुरू असून ११ नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर पर्यंत गाळप झालेल्या ऊसाची बिले रु 2985 प्रतिटना प्रमाणे एकरकमी 26 नोव्हेंबर रोजी संबधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करणार आहेत. त्याचबरोबर वाहतूक दरामध्ये देखील 8 टक्केची मोठी वाढ करत असल्याचे हेमरसचे बिझनेस हेड भरत कुंडल यांनी सांगितले.
![]() |
वाहतुकदरात ८ टक्के वाढीच्या निर्णयाचे स्वागत साखर वाटून करताना वाहतूकदार |
प्रारंभी काही दिवसात मशिनरीमध्ये आलेल्या तांत्रिक बिघाडावर यशस्वीपणे मात करून प्रतिदिन आजअखेर साडे पाच हजार टन प्रमाणे गाळप चालू असून कारखाना पूर्ण क्षमतेने चालू आहे. चालू गळीत हंगामामध्ये ११ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर पर्यंत गाळप झालेल्या ऊसाची बिले रु २९८५ प्रतिटना प्रमाणे एकरकमी २६ नोव्हेंबर रोजी संबधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करत आहे. जाहीर केलेला दर हा भागातील इतर कारखान्यांच्या तुलनेने दीडशे ते दोनशे रुपये प्रतिटन ज्यादा आहे. यापुढेही दर १० दिवसाला गाळप होणाऱ्या ऊसाची बिले अदा केली जाणार असल्याचे हेमरस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे तालुक्याबरोबरच इतर भागातील शेतकरी व नागरिकांनी जास्तीत-जास्त ऊस हा हेमरसला पाठविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले .
वाहतुकदारांना सामोरे जाव्या लागणाऱ्या अनेक प्रश्नांबाबत चर्च्या करताना भरत कुंडल पुढे म्हणाले कि, ``कारखान्या पर्यंतचा वाहतुकीचा काही प्रमाणातील रस्ता खराब झाला असून वाहनांच्या देखभाल दुरुस्ती तसेच अनेक अडचणींचा विचार करून वाहतूक दरामध्ये यंदा ८ टक्के भरघोस वाढ करत आहोत. त्यामुळे कामगार, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बरोबरच वाहतुकदारांनाही न्याय देण्याचा प्रयत्न असल्याचे केन हेड सुधीर पाटील यांनी सांगितले. यावेळी ऊस तोडणी कामगार व वाहतूकदारांनी भरत कुंडल व कारखाना प्रशासनाचे आभार व्यक्त करून साखर वाटून आनंद साजरा केला. यावेळी प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत करताना ऊस तोडणी व वाहतूक दारांकडून सदैव सहकार्य मिळेल याची ग्वाही दिली. यावेळी केन हेड सुधीर पाटील, एच आर हेड अजित झुंजानी, अनिल पाटील असिस्टंट केन मॅनेजर, हेमरस कामगार युनियनचे अध्यक्ष संताराम गुरव, सेक्रेटरी रवळनाथ देवण, मेम्बर गुंडू गावडे यांच्या बरोबर तोडणी व वाहतूकदार जयवंत पाटील,बाळू ओऊळकर,दीपक बामणे,धनंजय कापसे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment