अडकूर येथे क्रेडिटएक्सेस ग्रामीण लिमिटेड यांच्याकडून मास्क व सॅनिटायझरचे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

24 November 2020

अडकूर येथे क्रेडिटएक्सेस ग्रामीण लिमिटेड यांच्याकडून मास्क व सॅनिटायझरचे वाटप

अडकूर येथे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करताना प्रमोद सनदी , धनाजी साळोखे , सुनिल विधाते.

अडकूर - सी. एल. वृत्तसेवा

     अडकूर (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना क्रेडिटएक्सेस ग्रामिण  लिमिटेड  गडहिंग्लज आणि नव्य दिशा यांच्याकडून मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

     यावेळी गडहिंग्लजचे शाखाधिकारी प्रमोद सनदी, धनाजी साळोखे, नव्य दिशा संस्थेचे सुनिल विधाते, सरपंच यशोधा कांबळे, उपसरपंच अनिल कांबळे, सदस्य  बंडू चंदगडकर, ग्रामसेवक एस. ए. सोनार, क्लार्क शिरीन, शिपाई तानाजी कांबळे,  ग्रामस्थ राजेंद्र चंदगडकर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment