चंदगड पोलिस बाॅईज संघटनेकडून 26/11च्या हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली - चंदगड लाईव्ह न्युज

29 November 2020

चंदगड पोलिस बाॅईज संघटनेकडून 26/11च्या हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली

 

चंदगड पोलिस बाॅईज संघटनेकडून 26/11च्या हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 

चंदगड / प्रतिनिधी

     मुंबई येथे 26/11रोजी झालेल्या आतंकवादी भ्याड हल्याचा निषेध व शहिदांना श्रद्धांजली कार्यक्रम चंदगड येथे पार पडला.

      ना जातीसाठी, ना पातीसाठी, एक दिवस पोलिसांसाठी, ह्या संघटनेच्या ब्रीदाला अनुसरून पोलीसांना गुलाबपुष व गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. भव्य व दिव्य मशाल रॅली, देशभक्तीपर गाणी व घोषणांच्या गजरात पार पडली. 

        मशाल रॅलीचा चंदगड मधील संभाजी चौक ते चंदगड पोलिस ठाणे रॅलीचे नियोजन सौ. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष अविनाश शहापुरकर, तालुका उपाअध्यक्ष जीवन कांबळे,  सचिव विजयकुमार गावडे, प्रकाश खरुजकर, सागर गावडे, मनोज खरुजकर, सागर पवले, लक्ष्मण गावडे, श्री. सुतार  यांनी केले.

      रॅलीसाठी  सहाय्यक पोलिस निरीक्षक पवार व चंदगड पोलिस ठाण्यातील सर्व पोलिस बांधव, आर. टी. ओ. चेक पोस्ट, पाटणे फाटा पोलिस चौकी, कोवाड पोलिस चौकीचे सहकारी हजर होते.No comments:

Post a Comment