![]() |
कोवाड येथे मतदान केंद्र भेट प्रसंगी प्रसंगी पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे, सहाय्यक फौजदार हनुमंत नाईक, केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत पाटील, सीसीटीव्ही तंत्रज्ञ नितीन देशमाने आदी. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२० साठी चंदगड तालुक्यातील ११ मतदान केंद्रावरील तयारी पूर्ण झाली आहे. पदवीधर मतदानसाठी कन्या विद्यामंदिर चंदगड, केंद्रीय प्राथमिक शाळा दाटे, मराठी विद्यामंदिर हेरे, कुमार विद्यामंदिर तुर्केवाडी या ठिकाणी प्रत्येकी एक तर केंद्रीय प्राथमिक शाळा कोवाड येथे मतदार संख्या अधिक असल्यामुळे दोन बुथ ठेवण्यात आले आहेत. शिक्षक मतदानासाठी कन्या विद्यामंदिर चंदगड, केंद्रीय प्राथमिक शाळा दाटे, मराठी विद्या मंदीर हेरे, केंद्रीय प्राथमिक शाळा कोवाड व कुमार विद्यामंदिर तूर्केवडी येथे प्रत्येकी एक बुथ आहे. या सर्व मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार आहे. यासाठी सर्व केंद्रावर आज रविवारी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून पूर्ण करण्यात आले.
मतदान केंद्रावरील विद्युत पुरवठा, स्वच्छतागृहे, पाण्याची सोय, मतदान केंद्रापर्यंत जाणे-येणेचा मार्ग, फर्निचर आदी सुविधांच्या पुर्ततेसाठी प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार विनोद रणवरे, गटशिक्षणाधिकारी सौ. एस. एस. सुभेदार, झोनल ऑफिसर आर. बी. गजलवाड गेल्या आठ दिवसापासून प्रयत्नशील असून त्यांना विस्ताराधिकारी एम. टी. कांबळे, सर्कल आप्पासाहेब जिनराळे, तलाठी दीपक कांबळे, सर्व संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, तलाठी, ग्रामसेवक आदींचे सहकार्य लाभत आहे. आज दि. २९ चंदगडचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे, सहाय्यक फौजदार हनुमंत नाईक, देसाई, गवळी आदी अधिकाऱ्यांनी पथकासह भेट घेऊन सुरक्षा व अन्य सुविधा बाबत समाधान व्यक्त केले. मंगळवारी होणाऱ्या मतदानासाठी सर्व बुथवर उद्या सोमवारी मतदान अधिकारी व यंत्रणा पोहोचणार आहे.
No comments:
Post a Comment