तो व्हिडिओ चंदगड तालुक्यातील नाही, नागरिकांनी घाबरू नये - वनविभागाचा खुलासा - चंदगड लाईव्ह न्युज

29 November 2020

तो व्हिडिओ चंदगड तालुक्यातील नाही, नागरिकांनी घाबरू नये - वनविभागाचा खुलासा

व्हिडीओतील वाघीण व त्याची पिले

चंदगड / प्रतिनिधी 

         समाज माध्यमावर एक वाघीण व तीन बछडे यांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हाॅयरल झाला आहे. चंदगड तालुक्यातील तिलारीघाट परिसर व रामघाट परिसरात या वाघीणी व तीन बछड्यांचा वावर असल्याचा व्हीडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. तथापी सदरचा व्हीडीओ हा चंदगड तालुक्यातील नसुन इतर ठिकाणचा व्हीडीओ whatsapp च्या माध्यमातुन सर्वत्र व्हायरल होत आहे. सदरचा व्हीडीओ हा चंदगड तालुक्यातील नसलेची माहीती स्थानिक चौकशी व क्षेत्रीय वनकर्मचारी यांच्या चौकशीतुन निष्पण झालेले आहे. त्यामुळे नागरिकांनी या व्हिडिओवर विश्वास ठेऊन नये असे आवाहन वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांनी केले आहे.
No comments:

Post a Comment