मोदगे येथे जवान महादेव पाटील यांच्या स्मृतींना उजाळा, २००१ ला काश्मीरमध्ये शहीद - चंदगड लाईव्ह न्युज

29 November 2020

मोदगे येथे जवान महादेव पाटील यांच्या स्मृतींना उजाळा, २००१ ला काश्मीरमध्ये शहीद

मोदगे : शहीद जवान महादेव यांच्या स्मारकाजवळ अभिवादन कार्यक्रमाला उपस्थित ग्रामस्थ.

कागणी : एस. एल. तारीहाळकर

           राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथून जवळच असणाऱ्या मोदगे (ता. हुक्केरी) येथील शहीद जवान महादेव कल्लाप्पा पाटील यांच्या विसाव्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करून ग्रामस्थांनी आपल्या भाषणातून त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. वीरमाता अनुबाई पाटील, वीरपत्नी वैशाली पाटील, शहीद जवान यांचे भाऊ विष्णू पाटील, शुभम महादेव पाटील यांचा उपस्थित मान्यवरांनी सन्मान केला.

            विष्णू पाटील म्हणाले, देशाच्या संरक्षणासाठी आमच्या भावाने बलिदान दिले, याचा आम्हाला अभिमान आहे. देश रक्षणासाठी नव्या पिढीच्या, नव्या दमाच्या तरुणानी पुढे येणे गरजेचे आहे. भर तारुण्यात शहीद जवान महादेव हे 27 नोव्हेंबर 2001 रोजी काश्मीर येथील पुंछ, राजुरी या भागात ऑपरेशन रक्षक मोहिमेवर असताना शहीद झाले. अतिरेक्यांचा शोध घेत असताना लपून बसलेल्या अतिरेक्यांनीच अचानक पणे त्यांच्यावर गोळीबार झाला. त्यांचे कार्य आम्हा सर्वांना प्रेरणादायी आहे.

           मोदगे येथील माध्यमिक विद्यालया जवळील स्मारकाजवळ अभिवादन कार्यक्रमात अनेक ग्रामस्थाने आपल्या भावना व्यक्त केल्या. शरद पाटील, गणपती कोकितकर, विलास कोकितकर, रविकांत बागडी, जोतिबा केसरकर, पांडुरंग दळवी, नारायण कोकितकर, प्रथमेश पाटील, कौशिक कोकितकर, पांडुरंग पाटील, दीपक बागडी, इराप्पा कोकितकर, हरिभाऊ कोकितकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment