![]() |
रुक्मिणी हिरामणी जाधव हिरामणी वैजनाथ जाधव |
पत्नीवियोग सहन न झाल्याने पंधरवड्यात पतीचेही निधन झाल्याची धक्कादायक घटना देवरवाडी (ता. चंदगड) येथे घडली. यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
रूक्मिणी हिरामणी जाधव (वय ८२) यांचे अल्पशा आजाराने रविवारी दिनांक 15 रोजी निधन झाले. आपल्या पत्नीचे निधन झाल्याचा धक्का सहन न झाल्याने त्यांचे पती व देवरवाडी गावचे पहिले सरपंच हिरामणी वैजनाथ जाधव (वय 88) यांचेही हृदयविकाराने रविवार दिनांक २९ रोजी निधन झाले. ते वैजनाथ देवस्थानचे स्थानिक उपसमितीचे पहिले अध्यक्षही होते.
त्यांच्या पश्चात पाच मुलगे, दोन मुली, नातवंडे, पणतवंडे असा परिवार आहे. देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष वामन जाधव तर विद्यमान उपाध्यक्ष शशिकांत जाधव तसेच पोल्ट्री व्यावसायिक प्रताप जाधव, ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य व सामाजिक कार्यकर्ते राजाराम जाधव,
राकस्कोप (बेळगाव) येथील अंगणवाडी शिक्षिका अक्काताई बेळवटकर यांचे ते वडील होते. रक्षाविसर्जन मंगळवार दिनांक १ रोजी होणार आहे.
No comments:
Post a Comment