कडलगे बुद्रुकचे मारुती पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

11 November 2020

कडलगे बुद्रुकचे मारुती पाटील यांचे निधन

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

         कडलगे बुद्रुक (ता. चंदगड) येथील टेम्पो वाहतूक व्यवसायिक मारुती निंगाप्पा पाटील (वय 53) यांचे दुर्मिळ अशा 'डी मोटो निरॉन' या आजाराने रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा, मुलगी, दोन भाऊ, पुतणे असा परिवार आहे. हिंडलगा येथील पाटील ट्रान्सलाईनचे मालक अनंत पाटील-मलतवाडीकर यांचे मेहूणे तर महाराष्ट्र राज्य चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे चंदगड तालुका उपाध्यक्ष कुंदन पाटील यांचे ते काका होत. गोवा येथील फळ व्यावसायिक विठोबा पाटील व प्रगतशील शेतकरी सिताराम पाटील यांचे ते बंधू होत.
No comments:

Post a Comment