मलिग्रे येथे पोलिस, फौजी भरती संदर्भ मार्गदर्शन मेळावा संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

09 November 2020

मलिग्रे येथे पोलिस, फौजी भरती संदर्भ मार्गदर्शन मेळावा संपन्न

सैनिक भरतीसाठी मार्गदर्शन करणाऱ्यांचा सत्कार करताना नि . पो . अधिकारी कृष्णा जाधव , उद्योजक नाना नेसरीकर

आजरा (प्रतिनिधी)

     मलिग्रे (ता. आजरा) येथील मलिग्रे सार्वजनीक वातनालयाच्या वतीने बेरोजगार  विद्यार्थी, विद्यार्थिनींना मार्गदर्शन व पोलिस मिलिटरी भरती पुर्व प्रशिक्षण देणाऱ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी उद्योजक नाना नेसरीकर ,प्रमूख मार्गदर्शन मुंबई क्राईम बँचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त रिटायर पोलिस अधिकारी कृष्णा जाधव होते.                      

       यावेळी श्री. जाधव यांनी जिवनामध्ये कोणतेही काम प्रामाणीक पणे करावे, काम कोणतेही असो लाज बाळगणेची गरज नाही, आपल्या शिक्षणाचा उपयोग नोकरीसाठी व समाजासाठी करा. तुम्ही प्रगतीवर असताना सारे सोबत असतात परंतू अडचणीच्या वेळी स्वतः खंबीर राहणे आवश्यक असून माझ्या जिवनात असे अनेक प्रसंग आले, यासाठीची प्रेरणा मला ए. टी .एस .अधिकारी विजय साळसकर यांच्या कडून मिळाल्याचे सांगीतले.          

       यावेळी विद्यार्थ्यांना  पोलिस  व मिलीटरी प्रशिक्षण देणारे  माजी सैनिक हुसेन मुल्लाणी , सैनिक कृष्णा मराठे ,राजेस कोकितकर  यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करणे आला.यावेळी विश्वास बुगडे ,हुसेण मूल्लाणी, कृष्णा मराठे यानी मनोगत व्यक्त केले. स्वागत शिवाजी भगुत्रे,सुत्रसंचालन संजय घाटगे यानी केले.  उपस्थित विद्यार्थी व ग्रामस्थांचे आभार संतोष कागिनकर यांनी मानले.



No comments:

Post a Comment