पोलीस कॉन्स्टेबल आनंदराव देसाई यांचा सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

09 November 2020

पोलीस कॉन्स्टेबल आनंदराव देसाई यांचा सत्कार

पोलीस कॉ. आनंदराव देसाई यांचा सत्कार करताना स. पो. नि. अविनाश माने व इतर. 

नेसरी / सी .एल. वृत्तसेवा

        कागणी (ता .चंदगड ) येथील सुपुत्र व नेसरी पोलीस ठाणेकडील पोलीस कॉन्स्टेबल आनंदराव देसाई याना जिल्हा पोलीस दलाकडून कोव्हिड योद्धा प्रमाणपत्र प्राप्त झालेबद्दल व चंदगड येथे बदली झालेबद्दल त्यांचा स. पो. नि. अविनाश माने व स्टाफ च्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला .

         नेसरी पोलीस ठाणेत 5 वर्षाच्या कारकिर्दीत गुन्हेगारी प्रवृत्तीला थारा दिला नाही हेब्बाळ बँक दरोडा प्रकरणी आरोपी पकडून मोका लावला. दिवसा घरफोडी करणाऱ्या आजरा,चंदगड,गडहिंग्लज व भुदरगड मध्ये तब्बल 16 घरे फोडणारा त्याचेकडून सोने,चांदी,पैसा जप्त करून मूळ मालकाना परत दिला. कर्नाटकातील चोर पकडण्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या या कामगिरीचे कौतुक होते आहे.

No comments:

Post a Comment