हंदेवाडीत डॉ संभाजी कदम व आनंदराव मटकर यांचा सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

09 November 2020

हंदेवाडीत डॉ संभाजी कदम व आनंदराव मटकर यांचा सत्कार

हंदेवाडीत डॉ . कदम व प्रशासकीय अधिकारी आनंदराव मटकर यांचा सत्कार करताना मान्यवर.

नेसरी / सी. एल. वृत्तसेवा

      हंदेवाडी (ता. आजरा ) येथील सुपुत्र डॉ. संभाजी कदम यांची शिवराज कॉलेज गडहिंग्लजच्या नूतन प्र. प्रचार्यपदी निवड झालेबद्दल तर आनंदराव मटकर यांची मुंबई पोलीस दलाच्या प्रादेशिक विभागात प्रशासकीय अधिकारी म्हणून पदोन्नती झालेबद्दल ग्रामस्थ व ब्रम्हा विकास मंडळ मुंबई यांच्यावतीने शाल,श्रीफळ व पुष्पपगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

 प्रतिमापूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. स्वागत व प्रास्ताविक मॅनेजर जनार्दन बामणे यांनी केले. यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. संभाजी कदम म्हणाले की ,आई वडिलांच्या सुसंस्कारामुळे आपण या पदापर्यंत येऊन पोचलो असून आपण या पदाला साजेसे असे काम करणार आहे . शैक्षणिक सहकार्य कोणाला हवे असलेस आपण त्यासाठी प्राधान्य देऊ असे सांगितले. यानंतर बोलताना प्रशासकीय अधिकारी आनंदराव मटकर यांनी पोलीस दलात  आपल्या पदामार्फत सहकार्य करता येईल तेवढे करणार असून आपल्या सर्वांचा मी ऋणी राहीन असे सांगितले आपण खूप कष्टातून इथपर्यंत आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अध्यक्षीय भाषणात माजी प्राचार्य एम. डी. पाटील म्हणाले, आपली संस्कृती व यशाची परंपरा पुढच्या पिढीनेही अशीच सुरु ठेवावी. तसेच या सुपुत्रानि गावचे नाव उंचावल्याचे त्यांनी सांगितले.

         सेवानी प्रा. एस. डी. कदम, प्रा. एन. डी. केसरकर, माजी प्राचार्य एम. डी. पाटील, के. के. कदम, डॉ. एस. डी. पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. आभार एन. डी. रेडेकर यांनी मानले. यावेळी पो. पा. पुंडलिक फडके, विष्णू रेडेकर,अरुण जाधव,.हरिओम कदम महाराज, मधुकर हेबाळकर, महादेव फडके, अंजना हेबाळकर, वसंत सावंत तसेच स्वराज ग्रुप व जयशिवराय मंडळ पदाधिकारी व सदस्य, विकास संस्था, दूध संस्थेचे पदाधिकारी, सदस्य, ज्येष्ठ नागरिक संघटना पदाधिकारी व सर्व सदस्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment